
दिल्ली,संसद भवन /प्रतिनिधी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवन परिसरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, पिक विमा योजनेतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि इतर महत्त्वाच्या शेतीविषयक समस्यांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या निदर्शनांमध्ये खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत प्रामुख्याने खा. कल्याणजी काळे, खा. वर्षाताई गायकवाड, खा. प्रतिभाताई धनोरकर, खा. रवींद्र चव्हाण, खा. प्रणितीताई शिंदे, खा. नामदेव कीरसान, खा. गोपाल पाडवी हे उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व खासदार एकवटल्याचे चित्र यावेळी दिसून आले.