
भुयारी मार्गाची संपूर्ण काम होईपर्यंत रेल्वे गेट सुरू ठेवा., अन्यथा रोको आंदोलन होणार – — खासदार बळवंतराव वानखडे
अंजनगाव बारी / पवन इंगोले
गेल्या तीन दिवसांपासून अंजनगाव बारी नजीकच्या पार्डी (देवी) भुयारी अंडरपास मार्ग जलमय झाल्याने ग्रामस्थांसह नागरिक ,विद्यार्थ्यांना येता– जाताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असुन स्थानिक पार्डी ग्रामपंचायने वारंवार यांचा पाठपुरावा जिल्हा प्रशासनाकडे केला असुन त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसुन अखेर आज दि.११ रोजी खासदार बळवंत वानखडे यांनी या मार्गाची पाहणी करून रेल्वे प्रशासनाला कडक सुचना देत रेल्वे गेट ( काॅसिंग) लवकरात लवकर सुरू करण्यात मागणी रेटून धरली असुन त्यावर येत्या दोन दिवसात निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभेमध्ये पार्डी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे पार्डी येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले.यावेळी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता, रेल्वे अधिकारी व कर्मचारी, शैलेश गवई , ग्रामपंचायत सचिव ओम पिहुलकर, तलाठी प्रिती कराडे, पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनिल चव्हाण, पोलीस पाटील नितीन बेंडे,अंजनगाव बारी तलाठी विजय देशमुख,अमोल चांदणे,सुरेश इंदाणे,मोहन जाखड,डॉ.बाबाराव ढेंबरे , देविदास ढेंबरे, साहेबराव ढेंबरे, तसेच सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलामनबी इंदलेकर , महिला आघाडी अध्यक्ष रक्षणा सरदार, राजू पिसे, गिरीश चौधरी, तुकाराम राठोड, संघपाल सरदार, संजू ढेबरें, किशोर ढेपे, अशोक ढेंबरे, प्रविण ढेंबरे, सुरज हटवार, संघशील बगळे, राहूल ढेंबरे, तुकाराम चव्हाण, धनश्याम ब्राह्मणे, संजय नितनवरे, किशोर कोरडे, चंद्रकांत महल्ले, सुरेन्द्र बनसोड, डॉ.जीवन सवाई, अशोक नगरगडे, भास्कर कुलरकर, गुणवंत काळे, धम्मदिप वासेकर, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी पार्डी (देवी) रेल्वे गेट जवळील भुयारी मार्गाची पाहणी केली असता यापासून विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याचे निदर्शनास आले., याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पार्डी देवी रेल्वे गेट पुर्ववत सुरू करुन करुन भुयारी मार्गातील पाण्याचा बंदोबस्त लावून या मार्गाचे काम पुर्ण करावे याबाबतच्या सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
— रवी राणा,आमदार