
विविध मागण्यांची दिले निवेदन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा, शिवरा,जगतपुर येथील पारधी समाजाच्या मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे अध्यक्ष: उमेश पवार तसेच आदिवासी फासेपारधी बहुउद्देशीय ग्रामीण लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष: रवेश भोसले व संघटना व संस्थेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात अमरावती प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्या यश मिळाले आहे. या बेड्यावरील समस्याच्या आढावा घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, व तलाठी यांनी गाव गृह भेट देण्यात यावी यावेळी त्यांनी स्थानिक समस्याची पाहणी करून पारधी वस्तीवर पाणी करून पारधी बांधावासी संवाद साधावा.पारधी समाज, जो आदिवासी समुदायाच्या एक महत्त्वाचा घटक आहे, गेल्या पन्नास वर्षापासून मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा, शिवरा,जगतपुर, बेड्यावर राहत आहे, पूर्वी शिकारीवर अवलंबून असलेला हा समाज वनाक्क कायदा आणि पशु हक्क कायद्यामुळे शिकार करू नये शकत, परिणामी उपजीविकेसाठी भीक मागण्याची वेळ आली आहे, तीन पत्राच्या घरामुळे पावसाळ्यात पाणी गळती आणि चिखलमय परिस्थितीमुळे रोजगारी पसरते, येथे काँग्रेटीकरण नाल्या, काँग्रेटीकरण रस्ते, आदिवासी भवन, विद्युत सुविधा आरोग्य सुविधा आणि घराचे मालकीचे हक्काचे पट्टे यासारख्या मूलभूत सुविधा अभाव आहे. गावकऱ्याकडून योग्य वागणूक न मिळाल्याने आणि सुविधांच्या कमतरतेमुळे येथील मुले शिक्षणापासून वंचित आहेत.युवा उमेश पवार यांनी या समस्या कडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम साहेब, जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अपर आयुक्त यांच्याकडे सातत्याने निवेदने दिले. त्याच्या अथक प्रयत्नामुळे प्रशासनाने या मोजा मंगरूळ चव्हाळा पारधी बेडा येथील गाव गृहभेट दिली पाहिजे.भेटी दरम्यान अपर आयुक्त यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना द्याव्या. येत्या काळात येथे सुरू होणार असून रस्ते, नाले, आदिवासी भवन, विद्युत सुविधा, आरोग्य सुविधा आणि मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या दिशेने ठोस पावले उचलावे. यावेळी उपस्थित पारधी बांधवांनी अपर आयुक्त शब्द सुमनांनी स्वागत केले.या भेटीवेळी उमेश पवार, रवेश भोसले, संदेश पवार, शांतेश भोसले, गजानन भोसले आधी पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ही भेट भारतीय समाजासाठी आशाताई हरली आहे. उमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रशासनाच्या सहकार्याने या समाजाला त्यांच्या हक्क आणि मूलभूत सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजाच्या या यशाला मिळेल का हा इतर आदिवासी समुदायांसाठी प्रेरणादायी ठरेल पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी विवाह एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे अध्यक्ष: उमेश पवार व आदिवासी बहुउद्देशीय ग्रामीण लोक कल्याण संस्थेचे अध्यक्ष: रवेश भोसले आणि सर्व पदाधिकारी यांनी केली आहे. प्रशासनाच्या या भेटीमुळे पारधी समाजात नवीन आशेचा किरण निर्माण झाला असून, लवकरच सकारात्मक बदल दिसतील अशी अपेक्षा आहे.