शेतकऱ्यांची शासनाला नुकसान भरपाई मागणी.
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पापळ, वाढोणा रामनाथ येथे गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यामध्ये शेतातील सिमेंट काँग्रेट बांधलेल्या विहिरी सुद्धा खचल्या आहे. सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये दलदल निर्माण होऊन

पापळ शेतकरी उमेश बलखंडे वाढोणा रामनाथ शेतकरी नंदकिशोर प्रल्हाद माटोडे तर दि.16/9/2025 ला शेतकरी राजेंद्र उत्तमराव माटोडे यांच्या शेतातील विहीर खसली असुन त्यामध्ये तीनही शेतकऱ्यांचे मोटर पंप गाळ्यात भसले आहे हे दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान प्रत्येकी दीड लाखाची असुन शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत देऊन या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा या दोन्ही शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालय मा. तहसीलदार साहेब यांना नुकसान भरपाईचा अर्ज केला असून पंचनामेची मागणी केली आहे. या सदर घटनेचा पंचनामा महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्त रित्या करावा अशी गावकऱ्यांची मागणी व झालेल्या नुकसान चे शेतकऱ्यांना त्वरित मदत व्हावी असे गावकऱ्यांनी बोलून दाखवले.
