भव्य अवयव दान रॅलीचे आयोजन.
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
‘दान’ संस्कृतीचा संदेश समाजमनापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचफुलाबाई हरणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनगाव सुर्जी यांच्यावतीने एक आगळावेगळा व जनजागृतीपर अभिनव उपक्रम राबवून विद्यालयाच्या वतीने भव्य अवयव दान रॅलीचे आयोजन करण्यात आले.काढण्यात आलेली अवयव दान रॅली ही केवळ रॅली नव्हे, तर समाजमनाला स्पर्श करणारी प्रेरक भावना ठरली आहे.मृत्यूनंतरही आपण आपल्या शरीराचे काही अवयव दान करून कित्येकांना नवजीवन देऊ शकतो हीच खरी मानवतेची सेवा ठरू शकते.तथापि दानापैकी श्रेष्ठ दान अवयव दान ही संकल्पना समाजात रुजवण्यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.पंचफुलाबाई हरणे विद्यालयाचे नेहमीच समाजासाठी काहीतरी विधायक योगदान असते. आणि याच भावनेतून प्रेरित होऊन जय भवानी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जगनराव हरणे यांच्या संकल्पनेतून व संस्था अध्यक्ष प्रा. केशवराव हरणे यांच्या मार्गदर्शनात पंचफुलाबाई हरणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. जयश्री श्याम कळमकर यांनी दिनांक २६ ऑगस्ट २०२५ ला मंगळवारी विद्यालया तर्फे भव्य अवयदान दान रॅलीचे व्यापक आयोजन केले .याप्रसंगी सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. नंतर रॅलीची सुरुवात दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गजाननभाऊ लवटे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. विद्यार्थ्यानी हातात फलक, घोषवाक्ये व बॅनर घेऊन. “दान हीच खरी ओळख”, “जीवनदान हेच महान दान” “धनापैकी श्रेष्ठ दान- अवयव दान “अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. ,यावेळी अवयव दान जनजागृती पत्रक सुद्धा नागरिकांमध्ये वाटण्यात आली. नागरिकांनी रॅलीचे स्वागत, कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले .या रॅली मध्ये एकून ७३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी संस्थासचिव जगनराव हरणे यांनी “अवयवदानाने आपण केवळ एखाद्याचे प्राण वाचवत नाही, तर आपले अस्तित्व दुसऱ्याच्या आयुष्यात जिवंत ठेवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत हा संदेश पोहोचवणे ही अत्यंत महत्त्वाची व समाजोपयोगी बाब आहे.” असे मत व्यक्त केले.
प्रसंगी दर्यापूर मतदारसंघाचे माजी आमदार रमेशभाऊ बुंदीले, पंचायत समिती अंजनगावचेगटशिक्षणधिकारी सुधीरजी खोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, केंद्रप्रमुख रवींद्र कान्हेरकर, गटसमन्वयक प्रमोद दखने, त्याचबरोबर मा. प्राचार्य विनोद हाडोळे, मा. प्राचार्य श्याम कळमकर, ग्रामगीताचार्य मनोहरराव रेचे, पत्रकार सुदेश मोरे, गजेंद्र मंडलिक, गजानन चांदुरकर, मनोहर मुरकुटे, जयेंद्र गाडगे . या सर्व मान्यवरांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या समाजजागृतीतील सहभागाचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे पंचफुलाबाई हरणे विद्यालयाने समाजात अवयवदानाबद्दल जनजागृती घडवून आणली असून नागरिकांकडून विद्यालयाच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्राचार्या सौ. जयश्री कळमकर यांनी केले. रॅलीच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.शेवटी कार्यक्रमची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
