अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कॉस्च्युम ज्वेलरीचे प्रशिक्षण
तिवसा/ तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती तिवसा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन मार्डी येथे येथे करण्यात आले होते. प्रशिक्षण कालावधी एकूण 14 दिवसांचे होते प्रशिक्षणात 35 महिलांनी सहभाग नोंदविला.हेअर ब्रोस,नेकलेस,एरिंग जुट ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरी, तोरण, कंठी, हल्दी ज्वेलरी, बँगल्स,ब्रेसलेट इत्यादी अनेक प्रकारचे ज्वेलरी प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले.सदर प्रशिक्षणाला निखिल भस्मे R seti संचालक, रामभाऊ ताजने,कांचन गाडगे, हरीश फरकाडे,अजय कुलथे, स्वप्निल रोहनकर श्रुती वानखडे ( उमेद कक्ष, समिती तिवसा ) यांनी भेटी दिल्या व मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाचे समन्वय दीपक माहुरे R seti अमरावती यांनी पाहिले. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता सौ. ममता मोहोड (बँक सखी पंचायत समिती तिवसा)यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षक म्हणून अंकिता टिकले काम पाहिले.

