अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
दिशा फाउंडेशन, यवतमाळ यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक कमळूजी बापूजी डोईजड (गवळी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ “एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे. “जागरुक नागरिक, सशक्त राष्ट्र (माहिती अधिकार – हक्क, प्रक्रिया, परिणाम)” या विषयावर ही कार्यशाळा होणार असून नागरिकांना माहिती अधिकार कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.

ही कार्यशाळा रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्थळ भोजने सर अकॅडेमी, पी. आर. पोटे पाटील कॉलेज जवळ, गजानन टाउनशिप रोड, कठोरा, अमरावती असे आहे.कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. श्री. राजेंद्रजी पांडे (यशदा, पुणे – माहिती अधिकार सेल सदस्य व मानद व्याख्याते) मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अंकुशजी वाशिमकर (स्वीय सहाय्यक, मंत्री – कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. श्री. गोपालजी पुरोहित (अध्यक्ष, दिशा फाउंडेशन, यवतमाळ) यांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यशाळेसाठी प्रवेश पूर्णतः मोफत असून प्रवेश मर्यादित आहे. सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असून प्रथम नोंदणी करणाऱ्यांनाच सहभागाची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी दिलेल्या त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाचे संयोजक म्हणून दिनकर सुंदरकर (तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, अमरावती तालुका) व प्रा. योगेश भोजने (संचालक, भोजने सर अकॅडेमी) हे कार्य पाहत आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क : ९९७०२९४१०१, ७९७२७५५७८७ देण्यात आले आहे.
