
वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज
चांदूर बाजार / सुयोग गोरले.
वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे
वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज या करिता निर्मिती पब्लिक स्कूल येथील संस्थेचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे , विजयराव टोम्पे सचिव मार्गदर्शन मध्ये चांदुर बाजार येथे एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना साकारत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे मुख्याध्यापक तुषार खोंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून केले.चांदुर बाजार तालुक्यातील नानोरी रोड वरील असलेल्या निर्मिती पब्लिक स्कूल येथील शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे यंदाही 300 पेक्षा झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी संकल्पना निर्मिती स्कूल ने तयार केली आहे एक विद्यार्थी एक झाड, संकल्पनेतून शाश्वत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विकसित केले आहे. असे अनेक महत्व शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक यांनी सांगितले या वेळी सर्व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.