श्रीमती रामा देवी पूर्व लोकसभा अध्यक्ष व अमरावतीच्या डॉ रोमा राजेश बजाज यांना जीवन गौरव पुरस्कार
डॉ आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीच्या वतीने ७ मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देशभरातील विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहान देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून अमरावतीकरासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अमरावतीच्या सामाजिक तथा वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ रोमा राजेश बजाज यांना जीवन गौरव पुरस्कार तर अमरावतीच्या नऊ कर्तृत्ववान महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६ देऊन गौरव करण्यात येणार असून या सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला सकाळी राष्ट्रपती भवन पाहण्याची विशेष संधी मिळणार आहे. या प्रसंगी द फेम प्रिन्सेस ऑफ इंडियाचे सौंदर्य महिला सक्षमीकरण प्रतियोगितेचा अंतिम सोहळा देखील होणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त दिल्लीच्या संसद भवनाच्या बाजूला स्थित वायएमीए वीआयपी हॉल मधेआयोजित करण्यात आलेल्या या सम्मान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदास आठवले हे करणार असून श्रीमती रामा देवी पूर्व लोकसभा अध्यक्ष विशेष उपस्थित दर्शविणार असून तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केन्द्रीय मंत्री सत्यनारायण जटिया, माजी केन्द्रीय मंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी, राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोन्डे,अमरावतीचे खासदार श्री बळवंत वानखडे,पूर्व आयोग सदस्य श्रीमती सुरेख लामतुरे, माननीय डॉ.विंकी रुघवानी अध्यक्ष- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मुंबई आयटी राज्य समन्वयक भा ज पा डॉ संजीवनी इंद्रभुषण पांडे, डॉ इंदू गुप्ता संचालिका वायएमीए फॅशन इन्स्टिटयूट नवी दिल्ली श्रीमती उर्वशी मित्तल मानद एसोसिएशन सचिव, इनर व्हील इंडिया,श्री डेटाराम मनोजा राष्ट्रीय कार्यकारी सचिव विश्व सिंधी सेवा संगम भारत हे राहणार आहेत अमरावती हा महिला कर्तृत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक नामवंत महिलांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले आहे.त्यांचा रूपाने अमरावतीच्या मातीला विविध क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.सामाजिक सांस्कृतिकशैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अमरावतीचे नाव त्यांच्यामुळे जागतिक स्तरावर गाजलेआहे ही अमरावतीची गौरवशाली परंपरा आहे आणि हा अमरावतीचा गौरव सुद्धा आहे. या शहराचा गौरवशाली इतिहास आहे. या शहरातुन अनेक मोठ मोठ्या महिलांनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले.अमरावतीच्या महिलांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉआंबेडकर ग्लोबल फाउंडेशन व टीम झेनिथ इंटरनॅशनलच्यावतीने अमरावतीच्या नऊ महिलांचा दिल्लीत गौरव करण्यात येणार आहेत त्यांमध्ये श्रीमती रामा देवी पूर्व लोकसभा अध्यक्ष,अमरावतीच्या सामाजिक तथा वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ रोमा राजेश बजाज यांना जीवन गौरव पुरस्कार तर सामाजिक व राजकीय क्षेत्रासाठी डॉ प्रियका निलेश विश्वकर्मा, पर्यावरण शिक्षण क्षेत्रासाठी डॉ संगीता प्रदीप इंगोले, वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठी डॉ तृप्ती राजेश जवादे,डॉ गायत्री जयप्रकाश बनकर,डॉ सरला सुरेश निहलानी,सौ.निता देवेंद्र रामटेके,सामाजिक क्षेत्रासाठी महाराष्ट्र सरकारच्या बाल कल्याण समितीचे सदस्य महिला बाल कल्याण विभागाच्या मानव तस्करी विरोधी समितीचे सदस्य सूचिता बर्वे, शिवांगी राजेंद्र वेरूळकर,ऍड. डॉ. निता प्रफुल्ल कचवे, जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२६ देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वरूप शाल श्रीफळ, सन्मान पत्र, स्मृति चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असून विशेष म्हणजे या सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला सकाळी राष्ट्रपती भवन पाहण्याची विशेष संधी मिळणार या असून या प्रसंगी द फेम प्रिन्सेस ऑफ इंडियाचे सौंदर्य महिला सक्षमीकरण प्रतियोगितेचा अंतिम सोहळा देखील होणार आहे कार्यक्रमचे सूत्रसंचालन साहित्य २४ न्युच्या साहित्य संपादिका डॉ नीता त्रिपाठी, अमरावतीचे युवा प्रबोधनकार विभव निमकर करणार आहेत कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता टीम झेनिथ इंटरनॅशनलचे सांस्कृतिक प्रमुख मिथिल कळंबे,इव्हेंट कोऑर्डिनेटर क्रिती मुखिया,सुहानी आठवले,जिज्ञासा पाडेन,उर्मी आठवले,श्रुती गुल्हाने,समीक्षा वऱ्हाडे अथक परिश्रम घेत असून कार्यक्रमाच्याअधिक माहिती साठी डॉ मनीष गवई ९३७०१००८९८ यांच्याशी साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.
