अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील ओम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज मध्ये मोटीवेशनल सेमीनारचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मोटीवेशनल स्पीकर श्री विजयजी राऊत सर हे वक्ते होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ओम चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री दिनेशजी भोंडे, सौ वैशालीताई दिनेशजी भोंडे, श्री राजेशजी बोडखे, डॉ राजेशजी धुर्डे, डॉ पुजाताई राजेशजी धुर्डे, कोषाध्यक्ष श्री जीतेंद्रजी कटारमल, सौ सोनलताई जीतेंद्रजी कटारमल, प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते, प्रा डॉ कुणाल देशमुख, प्रा वैभव साखरे, प्रा पंकज बानाईत, प्रा आदित्य ब्राम्हणकर, प्रा निलेश गोमाशे , प्रा वैशालीताई ताडे, श्री टिपरे सर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींनी उपस्थितांना युपीएससी, एमपीससी, विविध स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास, स्कील डेवेलपमेंट, कम्युनिकेशन स्कील, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य या विषयांवर अनमोल मार्गदर्शन केले. या मोटिवेशनल सेमिनार ला इयत्ता 11 वी व 12 वी मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ पुजाताई हनवंते, संचलन सौ. दिपालीताई इंगळे तर आभार प्रदर्शन श्रीमती वंदनाताई उभाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलीत.
