नेर परसोपंत/ वसिम मिर्झा
अनेक दिवसांच्या सतत धार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले वर आलेल्या पिकांची नासाडी झाली अनेकांचे शेत आणि पिकं पाण्यामुळे खरडुन गेले तर अनेकांचे पिक पिवळे पडून झाडालाच कोंब फुटले,अनेकांची पिके सततच्या पावसामुळे पाण्याखाली गेली आहे प्रमाणाच्या बाहेर आलेल्या पावसामुळे नदी, नाले, तलाव, धरन ओव्हरफ्लो झाले आहे तर शेतकरयांच्या तोंडांत आलेला घास ढगफुटी सदृश पावसामुळे हातामधुन हिसकावल्या गेला आहे आणि याही पेक्षा लाजीरवाणी बाब म्हणजे शेतकऱ्यांना सरळ नुकसान भरपाई,

पिक विमा देण्यात येत नसून स्थानिक शासन,प्रशासन, कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आँनलाईन नुकसान नोंदी , पिक पाहणी असा सांत्वना देणारा कागदोपत्री खेळ खेळण्यात व्यस्त आहे जेव्हा की संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करुन दुर्गा उत्सव आणि दसरा आधी युती सरकारने शेतकरी बांधवांना सरसकट कर्ज माफी, पिक विमा किंवा सरळ हेक्टरी मदत देणे गरजेचे होते अत्यावश्यक होते.नेर शहर, तालुका काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार नेर यांना या बाबतचे निवेदन देऊन संपूर्ण नेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी बांधवांची तात्काळ सरसकट कर्ज माफी करावी ,हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी,२०२५ पिक विमा तात्काळ देण्यात यावा, ई-पिक पाहणी आॅफ लाईन करावी, सिसिआय कापूस नोंदी करीता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, कामगार,विश्वकर्मा साहित्य वाटप पुसद ऐवजी नेर किंवा यवतमाळ येथे करावे अश्या विविध शेतकरी , शेतमजूर, कामगार आणि जनतेच्या महत्वपूर्ण मागण्या चे निवेदन आज काँग्रेस कमिटी नेर तर्फे देण्यात आले यावेळी विनायकराव भेंडे पाटील तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नेर, सत्यविजय गुल्हाने शहराध्यक्ष, बाशीत खान माजी नगरसेवक, गणेश आप्पा झाडे, दिवाकर इंगोले, मुरलीधर काळे, आषिश हेडाऊ, नदिम शेख, शोयब खान, प्रशांत गुघाने, गौरव नाईकर महिला काँग्रेस कमिटी नेर कार्यकर्ते, युवा काँग्रेस कमिटी नेर कार्यकर्ते आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
