
दर्यापूर /रामेश्वर माकोडे
राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षात आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष (सा. न्याय. वि.) पदी निलेश गणवीर यांची निवड विश्रामगृह अमरावती येथे करण्यात आली आहे. निलेश गणवीर हे रा. काँ. चे जुने जाणते कार्यकर्ते असून संघटन सचिव पदी धुराही ते सांभाळत आहेत. मा. पंडित प्रभात कांबळे यांनी नियुक्ती केली आहे.
अमरावती ग्रामीण जिल्हात पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वत्रकालीन योगदान देण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री.आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या अमरावती जिल्ह्यात प्रथम आगमना प्रसंगी विश्रामगृह येते ग्रामीण कार्यकर्त्याची संवाद मेळाव्यात एकनिष्ठ कार्यकर्ता व प्राप्त केलेल्या विश्वासातून मा. प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.याप्रसंगी मा.आमदार रोहित दादा पवार, श्री. हर्षवर्धनजी देशमुख, श्री. अरुणभाऊ धर्माळे, श्री. भास्करराव ठाकरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.अनिल भाऊ जळमकर, रा. काँ. पक्षाचे सर्वे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्यगण व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हा कार्यकारणी तर्फे त्यांचे अभिनंदन केले आहे.