मोर्शी / संजय गारपवार
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी गावातील विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन मीटर लावल्यामुळे झालेले प्रचंड बिल वाढ यावर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली.या निवेदनाच्या माध्यमातून नेरपिंगळाई येथे नवीन मीटर बदलविन्याचे काम थांबवावे असे सांगण्यात आले त्यासोबतच विद्युत तारेवर आलेले झाडाच्या फांदे आणि वेल काढण्यात यावे, महावितरण चे कर्मचारी मुख्यालयी ठेऊन वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर लक्ष देण्यात यावे,नेरपिंगळाई येथे सबस्टेशन मंजूर करून आणून व्हॉल्टेज मध्ये होणारा कमी जास्त विद्युत पुरवठा सुरळीत करावा, दिवसा शेती साठी ८ तास वीज आणि रात्रीला सिंगल फेज लाईन द्यावी तसेच ज्याभागात व्होल्टेज मध्ये अडचण येत आहे त्यासाठी नवीन विद्युत रोहित्रे बसविण्यात यावे अश्या मुद्याचे निवेदन यावेळी सहाय्यक अभियंता महा.रा.वीज वितरण कंपनी मर्या. नेरपिंगळाई यांना देण्यात आली यावेळी निलेश पांडे, संजय मंगळे, अमोल नवले, सागर माहोरे , सतीश इंगळे, रूपेश गणेश,संजय मोहोकर, अन्सार कुरेशी,बाळासाहेब खासबागे, रवी राऊत, शेख साजिद, अफसर पठाण, प्रविण तिजारे, संजय सुने, निलेश मंगळे, जहीरखान शेर खान, सूरज कुरसंगे यांच्या सह बरेच गावकरी उपस्थित होते.
