
नेर परसोपंत / वसीम मिर्झा
राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.चांद मोहम्मद साहेब नई दिल्ली यांचा महाराष्ट्र झंझावात दौरा सुरू असताना त्यांनी नेर येथे भेट दिली, यावेळी नेर येथे त्यांचे हर्ष ऊल्लासात स्वागत करण्यात आले, व यादरम्यान मीटिंग चे सुद्धा आयोजन करण्यात आले.तथाकथित स्वातंत्र्याच्या काळात भारत देशांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण केल्या जात आहे, व मूलनिवासी मुस्लिम बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून मॉबलींनचींग सारखे प्रकार घडवले जात आहेत,
या देशातील सामाजिक बंधुभाव नष्ट करण्याचा व अस्थिरता निर्माण करण्याचा मनुवादी प्रयत्न निरंतर चालू आहे, यावेळी मुस्लिम बांधवांनी सतर्कतेची भूमिका घेऊन कोणतीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे मनुवाद्यांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला, कारण बामसेफ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा हे एक कॅडर बेस संघटन असून मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात लढणार संघटन आहे, व हे संघटन जनजागृती बरोबरच कायद्याच्या चौकटीत राहून संविधानिक मौलिक हक्क अधिकार वाचवण्याची लढाई लढण्याचं काम संपूर्ण भारतात करते आहे, येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या संघटनेचा वाढ विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याकरिता मुस्लिम बांधवांन मध्ये कॅडर बेस नेतृत्व निर्माण करून या देशाची अखंडता व एकता बरोबरच बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य देशांमध्ये केल्या जाईल, या करिता मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मध्ये सहभागी होऊन कार्य वाढवले पाहिजे असे प्रतिपादन मीटिंग ची अध्यक्षता करताना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चांद मोहम्मद साहेब यांनी केले. यावेळी मौलवी रिजवान साहेब यांनी सुद्धा आपले मार्गदर्शन केले ही मीटिंग जमात खाना हॉल येथे मोठ्या प्रमाणात संपन्न झाली यावेळी मीटिंगला मौलाना आझाद विचार मंचचे शोएब खान, मानव अधिकार संघटनेचे रेहान खान, बीमोध मुधाने यवतमाळ – वाशिम लोकसभा अध्यक्ष, सुनील गवई भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या सह शहुंर खान, मोईन खान, अन्सार शाह, साबीर खान, बंटी पठाण, टिपू भाई, मोहम्मद अन्वेष, सय्यद नदीम, मो.दानिश, तौफिक शेख, वसीम खान, साजिद हसन, एस.एम.पठाण, मो. जाहिद, मो.जावेद शेख भोलू, मोहम्मद जुबेर, वाय.आर.मोटलानी, वासुदेवराव शेंडे राजीव डफाडे, त्रिशरण गायकवाड, अनिरुद्ध मुंदाने, मुरलीधर गायकवाड, मिलिंद जामनकर, कैलाश मेश्राम सुकलाल देशपांडे, डॉ.शरद मोरे, याबरोबर भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.