पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नेर परसोपंत/वसीम मिर्झा
दिनांक 7 सप्टेंबरला नेर शहरात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.ठाणेदार अनिल बेहराणी यांनी केलेल्या आव्हानानुसार अनेक गणेश मंडळांनी काढलेल्या मिरवणुकी दरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर केला.

गणपती विसर्जन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्तामध्ये तालुक्यातील पोलीस पाटील,निवृत्त पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधवांचा सुद्धा समावेश आहे.

यावेळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या सह शांतता समिती सदस्य जफर N खान बासीद खान तनवीर खान शारिक हुसैन हाजी इम्तियाज़ वंदना मिसळे भास्करराव तिडके नजीर राही वसीम बेग मिर्झा राजेंद्र चीरडे मो. राजिक खुशाल मीसाळ होमगार्ड समीक्षा ताई रुपालीताई प्राणिताताई मयूरीताई दुर्गाताई भारतीताई वैष्णवीताई मनीषाताई दिक्षाताई स्वातीताई यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील व पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
