
असंख्य कार्यकर्त्यांचा सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत
नेर परसोपंत/ वसीम मिर्झा
मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन यवतमाळ जिल्ह्यातील उबाठा गटात मोठी फुटीरवादाची लाट निर्माण झाली असून अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने नेर परसोपंतचे नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक गावचे सरपंच व नेर येथील आजी, माजी नगरसेवक, व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या पक्षप्रवेश सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड यांचे सह पश्चिम विदर्भाचे नवनियुक्त प्रभारी विभागीय समन्वयक परागभाऊ पिंगळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, चंद्रपूर यवतमाळ, लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षप्रवेशात प्रामुख्याने उबाठा गटाचे नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, नेरच्या माजी नगराध्यक्षा सुनीताताई जयस्वाल, नेरच्या माजी नगराध्यक्षा वनिताताई मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, नगरसेवक दिलीप मस्के, उबाठा अल्पसंख्यांक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष रिजवान खान, सामाजिक कार्यकर्ते गणेश शीलकावार, नगरसेविका सरिता मनोज सुने, सरपंच विक्रम झाडे, यांचे सह मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या पक्षप्रवेशाने मोठे फेरबदल होण्याचे चिन्ह दिसत आहे.