
सुदैवाने कोणतीही जिवित हानी नाही
नेर परसोपंत / वसीम मिर्झा
यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील पठाणपुरा येथे मिलमिली नदीकाठी अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेले सिकंदर खाँ सालार खाँ यांचा परिवार राहतो, हालाखीच्या परिस्थितीत कष्ट करून हा परिवार आपला उदरनिर्वाह करत आहे, शुक्रवार रोजी रात्रीपासून निरंतर पाऊस चालू होता, 2 वाजताच्या सुमारास संपूर्ण परिवार गाड झोपेत असताना अचानक घराची भिंत कोसळली व जीवित हानी होण्यापासून वेळ टळली.
भिंतीला लागून असलेल्या पलंगाच्या बाजूला लहान मुले झोपलेली होती, लोखंडी पलंगामुळे त्या मुलांचा बचाव होऊन ते मुले सुखरूप बचावली, ही बातमी कळताच सामाजिक कार्यकर्ते रजा शेख यांनी नैसर्गिक हानीत सापडलेल्या परिवाराला सहकार्य करण्याकरिता पुढे आले.
हा परिवार अनेक पिढ्यान- पिढ्या त्या जागेवर वास्तव्यास असून घर टॅक्स हे भरत असतात तरी सुद्धा ते घरकुल योजना पासून वंचित आहेत, “प्रत्येक गरिबाला घर ” या सरकारच्या काही घरकुल योजनेच्या माध्यमातून सरकारने त्यांना योग्य ते सहाय्य करून या पीडित समाजाचे पुनर्वसन केले पाहिजे, असे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी सांगितले, व त्याकरिता भारत मुक्ती मोर्चा पुढाकार घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.