आझाद फाउंडेशन व अक्षर मानव संघटना यांचा संयुक्त उपक्रम
तिवसा / तालुका प्रतिनिधी
महिलांचे शिक्षण आणि महिलांचा रोजगार यातिल दरी वाढतच जात असतांना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे कसं उभं करता येईल. एकल महिलेचा उपजिविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी आझाद फाउंडेशन तिवसा व अक्षर मानव संघटना तर्फे संयुक्तरित्या गरजू महिलांच्या हाताला काम देण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहे. दिनांक 19 मार्च , 2026 रोजी, नविन कोर्ट समोर तिवसा येथे सायंकाळी 6 वाजता महिलांचं घरगुती संकल्पनेतुन निराश्रित महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या “स्वाद आस्वाद” नावाचं रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कवीवर्य प्रा. अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अक्षर मानवचे राज्य नियंत्रक तथा आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आझाद जमा खान , राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय, महागाव, यवतमाळचे प्राचार्य. प्रा. डॉ. संजय खडसे सर , अक्षर मानव अमरावती विभागाच्या संचालिका अश्विनी वितोंडे-खान, अक्षर मानव नागपूर विभागाच्या संचालीका तसेच महिला समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. यमुनाताई नाखले या नागपूर वरुन या उद्घाटनासाठी उपस्थित होत्या. अश्विनी वितोंडे-खान या अक्षर मानव अमरावती विभागाच्या संचालिका म्हणून नियुक्ती झाल्यावर सुरुवातीसच त्यांनी ‘स्वाद आस्वाद’ या नावाने खानावळची सुरुवात करून हा उपक्रम तिवसा येथे सुरू केला आहे. दुर्बल , शोषित, वंचित वर्गातील महिला, गरिब वर्गातील महिला, मोलमजुरी करणाऱ्या महिला, दारिद्रय रेषेखालील महिला, निराधार, एकल, विधवा, परित्यक्ता, अविवाहित महिला अश्या सर्व बेरोजगार महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आझाद फाउंडेशन तिवसा व अक्षर मानव संघटनेच्या माध्यमातून संयुक्त रित्या विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना काम देण्यासाठी तयारी करत आहेत. ही गोष्ट अभिनंदनास पात्र आहे असे विचार अध्यक्षीय भाषणात थोरात यांनी व्यक्त केले. दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, खत व्यवसाय, मसाले व्यवसाय, हाॅटेलींग व्यवसाय, घरगुती खानावळ, होम स्टे, अक्षर मानव घर, मधुपालन व्यवसाय, अगरबत्ती प्रशिक्षण, मसाले व्यवसाय, जंगल साधणं सम्पंत्ती वर आधारित उद्योग, कापड उद्योग पासून तर ‘आझाद व्यवसाय सुविधा केंद्र’ या मार्फत लहान लहान सेवा देवून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक टिप्स, प्रशिक्षण महिलांना देण्यात येईल. अनेक व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना काम शिकवून त्यांना त्यांच्या पायावर कसं उभं करता येईल. एकल महिलांचा उपजिविकेचा प्रश्न सोडवू असा पद्धतीने आम्ही व्यवसाय शिकवू आजच्या काळात महिला स्वावलंबी बनुन समाजात आपली स्वतंत्र आणि प्रगल्भ ओळख निर्माण करून जगली पाहिजे महिलांसाठी आज काळाची ती गरज आहे. या साठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती अक्षर मानव महाराष्ट्राचे राज्य नियंत्रक तथा आझाद फाउंडेशनचे संचालिका सौ. अश्विनी वितोंडे-खान यांनी या प्रसंगी दिली. इतरही मान्यवरांनी आपले विचार व्यासपीठावरुन मांडले. कार्यक्रमासाठी नागपूर, वर्धा, आर्वी, अमरावती, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील अक्षर मानव चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राज्य नियंत्रक आझाद खान यांनी तर आभारप्रदर्शन कवियीत्री प्रांजलीताई आत्राम यांनी केले. ज्याही महिलांना कुटूंबातील जबाबदाऱ्या पार पाडत असतांना हाताला काम हवं असेल त्यांनी अश्विनी वितोंडे, यांना इथं दिलेल्या (9766096906) या क्रमांकावर संपर्क करावा .अश्या उद्योग व्यवसाया मधुनच ‘अक्षर मानव स्वयंमपुर्ण गावाची संकल्पना’ अक्षर मानवचे हे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास अक्षर मानवच्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन हे उद्योग व्यवसाय समजून घेतले. या कार्यक्रमासाठी संचालक सौ. अश्विनी वितोंडे-खान व अक्षर मानव अमरावती जिल्हा कार्यकारिणीने विषेश प्रयत्न केले.
