
शहर विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर आयुक्तांशी साधला संवाद
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती महानगर पालिकेच्या नवनियुक्त मनपा आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा (चांडक ) नुकत्याच रुजू झाल्या असून त्यांनी आपल्या सक्रिय कार्यभाराला देखील सुरुवात केली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर च्या शिष्टमंडळाने आज शुक्रवार दिनांक ०४ जुलै रोजी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. अमरावती नगरीला आयएएस दर्जाच्या महिला आयुक्त लाभल्या बद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी माजी महापौर अँड. किशोर शेळके,सौ.रीनाताई नंदा, माजी सभापती अविनाश मार्डीकर, भूषण बनसोड , मंगेश मनोहर , जयश्रीताई मोरे, माजी नगरसेविका ममता आवारे , सपना ठाकूर , तसेच राष्ट्रवादीचे जितेंद्रसिंह ठाकूर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत बोके आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्याशी संवाद साधतांना अमरावती शहर हे स्वच्छ, हरित व सुंदर बनविण्यासह शहरात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासंदर्भातील अनेक विषयांवर चर्चा केली. नुकत्याच अमरावती येथे मनपा आयुक्त म्हणून रुजू झालेल्या सौम्या शर्मा यांच्याकडे काम करण्याचे चांगले व्हिजन आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेहमी सहकार्य राहणार असल्याचा विश्वास सुद्धा शिष्ट मंडळाने व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवीण भोरे, योगेश सवई , आनंद मिश्रा, निलेश शर्मा, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांनी प्रसिद्ध केले आहे.