डिजे ढोल ताशे गुलाला फाटा देत वारकरी दिंडीने गणपती विसर्जन
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील राधे गणेशोत्सव मंडळाने पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे गुलाल डिजे याला फाटा देत वारकरी दिंडीने गणेश विसर्जन मिरवणूक काढून महापुरुषांच्या वेशभूषेने गणपती विसर्जन केले. या मिरवणुकीने नांदगाव वासियांचे लक्ष वेधले शांतता प्रिय वातावरणात गणेशोत्सव साजरा करून स्तुत्य उपक्रम राबविला.

उत्सव म्हटला की ढोल ताशा सजावट जल्लोषाने केला जातो मात्र राधे गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आगळावेगळा गणेशोत्सव साजरा केला दहा दिवसीय विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक पद्धतीने भारतीय संस्कृतीचे जतन करून डीजे, ढोल ताशे याला फाटा देत गुलाल न उधळता मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करून वारकरी दिंड्या लहान मुलींचे लेझीम पथक विशेष आकर्षण होते अकरा बैल जोड्याचा रथ ज्यात गणेशाची मूर्ती विराजमान होती महिलांची दिंडी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर,अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले तुकडोजी महाराज गाडगेबाबा, लोकमान्य टिळक,स्वामी विवेकानंद, शहीद विकास उईके यांच्या प्रतिमा सुद्धा देखाव्यात होत्या तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला विशिष्ट पोशाख उपस्थितांना आकर्षित करीत होता यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती अतिशय शांतता प्रिय वातावरणात गणपती विसर्जन मिरवणूक पार पडली ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मारोटकर यांनी नियोजनबद्ध मिरवणुकीचे आयोजन केले होते.

मंडळाचे अध्यक्ष अक्षय हिवराळे भूमेश्वर गोरे निलेश मारोटकर गजानन तायडे पवन जेवढे प्रेम हिवराळे अनिकेत गटूले श्रीकृष्ण कांबळे महेश वानखडे मनीष चौधरी मयूर वानखडे आकाश मंगळे निलेश झिमटे जय मोकळेकर भीमराव जेवढे दीपक तानकरvप्रदीप चौधरी शुभम मोकडेकर कार्तिक सोनवणे अमन मानकर पवन शिरभाते सुभाष लोखंडे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
खा अमर काळे यांची भेट
राधे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी भेट देऊन संपूर्ण मिरवणुकीची पाहणी करत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत शाबासकी दिली.
