नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथे शनिवार दि. 30/08/2025 सकाळी 11 वाजता शिवाई गणेशोउत्सव मंडळ व विठ्ठल बहुदेशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय अमरावती येथील विशेष तज्ञ् डॉक्टर ह्या शिबिराला उपस्तिथ होते, डोळे तपासणी, मधुमेह, ह्रदयविकार, अस्तिरोग तज्ञ्, स्त्रीरोग तज्ञ्, त्वच्यारोग तज्ञ्, नेत्ररोग तज्ञ्, कान, नाक, घसा तज्ञ्, इत्यादी तज्ञ् डॉक्टर उपस्तित होते, या शिबिरामध्ये 250 च्या वर रुग्णांनी आपली तपासणी व औषधोपचार केले, या कार्यक्रमचे उदघाट्न श्री.राजेशजी पाठक भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख उपस्तीथी म्हणून श्री. रंजितजी खंडाळाकर भाजप शहर अध्यक्ष,ज्येष्ठ नेते घनशयामजी सारडा,अरुणभाऊ लहाबर, अमोलभाऊ धवसे, रमेशभाऊ अवचारे, बाल्याभाऊ गव्हाणे, श्याम पाठक, जेयंद्र वीरूळकर,सुनिल बिटले,गजानन मारोटकर,उत्तसिग पवार इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्तित होते. या संपूर्ण रोगनिदान शिबिराचे आयोजन शिवाई गणेशउत्सव मंडळचे अध्यक्ष योगेश झिमटे,उपाध्यक्ष मयूर काकडे,सचिव अमन काकडे,सदस्य ओम काकडे, अजय काकडे, आकाश काकडे, तन्मय काकडे, हर्षल मारोटकर,प्रतीक मुके,यांनी केले होते.
