
श्रीराम लांबडे नवे ठाणेदार म्हणून रुजू
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांचे नुकतेच स्थानांतरण करण्यात आले असून त्यांच्या जागी अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षक श्रीराम लांबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीराम लांबडे यांनी आपल्या कार्यभाराची अधिकृतरित्या सूत्रे स्वीकारली असून नवे ठाणेदार म्हणून कामकाजास प्रारंभ सुद्धा केला आहे.पोलीस निरीक्षक श्रीराम लांबडे हे अत्यंत अनुभवी अधिकारी असून त्यांना विविध ठिकाणी सेवा देण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आपल्या पोलिसी सेवेला वरुड येथून सुरुवात असून त्यानंतर नागपूर सीबीआय विभागात अधिकारी म्हणून सेवा दिली. याशिवाय,भंडारा जिल्ह्यातील कारदा पोलीस स्टेशन येथेही त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केले आहे.मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून त्यांनी दोन वर्षांची यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. अमरावती येथील सायबर क्राईम विभागात प्रमुख अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या या विविध जबाबदाऱ्या व अनुभवाच्या जोरावर त्यांच्याकडून नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात प्रभावी कायदा-सुव्यवस्थेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीची अपेक्षा शहर वासीयाकडून व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांतर्फे नवनियुक्त ठाणेदार श्रीराम लांबडे यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा दर्जा आणखी उंचावेलअशी अपेक्षा यावेळी शहर वासियानी व्यक्त केली आहे.