
नांदगाव खंडेश्वर येथील “नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय” मध्ये शुभारंभ दिनी चिमुकल्यांची किलबिल.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथे नवीन शैक्षणिक सत्रातील पहिला दिवस “शुभारंभ दिन” म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी, शाळेच्या वर्ग ५ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यां सोबतच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शुभारंभ दिनाची सुरुवात प्रार्थने द्वारे करून, मा. मुख्याध्यापक श्री. प्रदीप रा. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केली. यावेळी उप-मुख्याध्यापक श्री. शशीकुमारजी देशमुख पर्यवेक्षक श्री. राजेशजी देशमुख व सर्व शिक्षकगण उपस्थित होते. शाळेबाबत संपूर्ण माहिती नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. याप्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात आला.तसेच, वर्ग ५ ते ८च्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या प्रवेशोत्सव दिनी विद्यार्थ्यांनी “सेल्फी पॉईंट” वर सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच, शुभारंभ दिनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.