नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सन 2025 = 26 अंतर्गत पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे रानभाजी महोत्सव घेण्यात आला सदर रानभाजी महोत्सवाला प्रमुख पाहुणे माननीय तहसीलदार अश्विनी जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्चना काकडे, गृह विज्ञान शाखा कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील , चर्जन सर, सहाय्यक कनिष्ठ प्रशासक,पंचायत समिती, पांडे सर विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी , मुजमुले सर नायब तहसीलदार, आत्म शेतकरी सल्लागार समिती सदस्य श्री अनिल झंजाट ,योगेश फुके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये शेतकरी, उमेद मधील महिला बचत गट , कृषी सखी इत्यादींनी वीस प्रकारचे रानभाज्या चे नमुने आणले होते त्यामध्ये सुरण,कटुले ,अंबाडी, जीवतीचे फुल, ओव्याची पानं, बांबू इत्यादींचा समावेश होता. काही शेतकरी गटांनी अंबाडीचे धपाटे अळूच्या वड्या शेवग्याची पावडर कडीपत्त्याचे पावडर इत्यादी उत्पादने विक्रीसाठी आणली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री विकास पाटील यांनी केले तसेच माननीय तहसीलदार जाधव मॅडम यांनी शेतकऱ्यांना रानभाज्यांवर प्रक्रिया करून उत्पादने तयार करून त्याचे निर्यात करावी व आपले अर्थार्जण वाढवावे असे उद्बोधन केले. प्रमुख मार्गदर्शक काकडे मॅडम यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व व त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रेरणा डफळे यांनी केले असून कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.

👌👍