
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणूक पक्षाने सर्व ताकतीने लढण्याचा निर्धार बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला.तसेच बैठकीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात उमेदवाराची चाचपणी सुद्धा करण्यात आली.यासह बैठकीमध्ये तालुक्याची तसेच नांदगाव खंडेश्वर शहराची नूतन कार्यकारणी तयार करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडी पूर्व चे जिल्हा अध्यक्ष मा. राहूलभाऊ मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार खंडारे आनंदरावजी इंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव गणपतरावजी तिडके उपस्थित होते. यांच्यासह वंचित बहुजन आघाडी चे तालुक्यातील जेष्ठ मार्गदर्शक नेते अनंतरावजी खडसे, मधुकरराव शेलारे वंचित बहुजन युवक आघाडी नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष रोशन गाडेकर वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार चे तालुका अध्यक्ष प्रणय मेश्राम, उत्तमराव इंगोले, प्रकाश तायडे, चंद्रमणी गणवीर, कपिलभाऊ नाईक, जयकिरण इंगोले, विनोद मोहोड, सुनील काकाने, अन्वर खान, गजानन डोंगरे, संजय वानखेडे, अनिल कुंभालवार, शिवदास लोणारे, नरेश लोणारे, नितेश डोंगरे, संजय आठवले, केवलदास मेश्राम, रामभाऊ नगराळे, सुधीर वैद्य, मो. नदीम शेख, धनपाल वाघमारे, ईश्वर पाटील, भोजराज साखरे, श्रीकिसन सोनोने यांच्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.