जिल्हा परिषद पं स निवडणुकीत संदर्भात
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुका लवकरच होणार आहेत. यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नांदगाव खंडेश्वर विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख निशांत हरणे व उपजिल्हा प्रमुख सुनिल केणे शिवसेना ज्येष्ठ नेते प्रशांत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या आढावा बैठकीत शिवसेना येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून आणता येतील. या पार्श्वभूमीवर शिवसेना सदस्य नोंदणी, निवडणूक आयोगाचे नियोजन आणि कार्यपद्धती यासंबंधी सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या दिग्गज नेत्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख पवन पाटील ठाकरे यांनी सांगितले.या आढावा बैठकीत शिवसेनेच्या शिलेदारांनी उपस्थिततांना येणाऱ्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेनेने तालुक्यातील भगवा फडकवण्याचा संकल्प केला.या बैठकीमध्ये जेष्ठ नेते राजेंद्र लेंडे, सुधिर खंडार, रवि राऊत,विलास धांडे, गणेश पाडर,मनोज जैन,अमोल शिरभाते, विवेक भगत,शैलेश पिंजरकर, संदीप चौधरी, निरंजन कारमोरे महादेव महाजन योगेश गुंजाळ महादेव खित्ते बैठकीत संचालक राहुल हजारे,तर आभार प्रदर्शन विवेक भगत यांनी केले,
