
गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांचा नवोदय मिशन 100 संकल्प
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
पं स नांदगाव खंडे अंतर्गत कार्यरत इयत्ता पाचवी व आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांची नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांचे संकल्पनेतून तहसिल कार्यालयाचे सभागृहात संपन्न झाली. कार्यशाळेला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साखरा पं स जिप वाशिम येथील विषय शिक्षिका मीनाताई मापारी यांचे NMMS या विषयाचे मार्गदर्शन लाभले तसेच विनोद झनक अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि प शाळा साखरा यांनी नवोदय गणित व शिष्यवृत्ती गणित या विषयांचे सवीस्तर मार्गदर्शन केले तसेच विजय गिरी जिल्हा परिषद शाळा कन्हेरी पंस रिसोड जि वाशिम यांचे नवोदय व शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन प्राप्त झाले तसेच उमाकांत कष्टे यांचे नवोदय संदर्भातील नवोदय व शिष्यवृत्ती विषयाचे सखोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार आश्विनी जाधव यांनी केले. त्यांनी आगामी काळात विद्यार्थी स्पर्धेत टिकवायचे असेल तर अशाप्रकारच्या कार्यशाळा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय झंझाड होते त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगतातून कार्यशाळा आयोजित केल्या बद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले. प्रमुख अतिथी व कार्यशाळेचे संकल्पक गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांचे संकल्पनेतून मिशन राबविले जात असून मुलांना अगदी बालवयापासून स्पर्धा परीक्षेचे अनौपचारिक महत्त्व कळावे. पुढील काळात आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम व्हावे यासाठी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा निश्चितच उपयोगी पडेल असे प्रतिपादन केले.
तसेच आपले शाळेतील 100% विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट करावे असे सर्व शिक्षकांना आवाहन केले. विस्तार अधिकारी विलास बाबरे यांनी मुलांच्या भविष्याचा ही कार्यशाळा प्रकाशाचा एक किरण संबोधून मत व्यक्त केले. कार्यशाळेचे आयोजन सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील सर्व विषय तद्न्य यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांनी, संचलन वैशाली दहीकर तर आभार प्रदर्शन वैशाली महाजन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख विलास राठोड, प्रविन मेहरे, बाळासाहेब मुंदे, अनिल कोल्हे, भूषण बागडे, बलदेव घुगे,अविनाश आढाव, शिक्षक सूरज मंडे, सुभाष गिरी, समीर रहसे, MIS समन्वयक संदिप देशमुख, वैशाली दहिकर, अर्चना मेश्राम, किरण गायकवाड, सविता जुमळे, रंगारी यांनी परिश्रम घेतले.