
अजय घरडे यांची नांदगाव खंडेश्वर तालुका प्रमुखपदी नियुक्ती
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या युवासेना नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नवे नेतृत्व कार्यभार सांभाळणार आहे. अजय केशवराव घरडे यांची युवासेना तालुका प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कोहळे,विभागीय सचिव सागर देशमुख,बाळासाहेब राणे, शरद बोदडे,गवई,शंकर मेश्राम, नितीन, प्रकाश पिलावड, अमित पाध्ये,नितीन मोरे,नंदू वाघाडे, पवन वाघाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
युवासेनेतील इतर महत्त्वाच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या
युवासेना उपतालुका प्रमुख चेतन सैरीसे, आयुष मोरे,पंचायत समिती सर्कल प्रमुख प्रवीण वाघोडे,विध्यार्थी उपतालुका प्रमुख आशिष वानखडे,विभाग प्रमुख उजेप पठाण,सोशल मीडिया प्रमुख मयूर बनारसे,सौरभ गायकवाड, अनिकेत चव्हाण,सूरज शेंडे, अर्थविक चुडे, केतन मेश्राम, तेजस सोरते, रोशन ठाकूर ही युवा टीमही या कार्यक्रमाला उपस्थित होती.या नव्या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील युवासेनेच्या कार्याला नवा जोश व दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.