महिलांसाठी आठ जागा, मागासवर्गीयांना योग्य प्रतिनिधित्व
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीठासीन अधिकारी सौ. श्रद्धा बबन उदावंत, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), यांनी भूषविले.सुरुवातीस उपस्थित नागरिकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया नियमावली आणि अटी याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची प्रत्यक्ष कार्यवाही पार पडली.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर पंचायत मुख्याधिकारी निवृत्ती भालकर, तसेच करण सोयम, विनय मोहोड, विकास सपकाळ, प्रीतम सोनटक्के, योगिता गायकवाड, किरण जवादे, आशिष ढवळे, संजय चौधरकर, राहुल सावळे, राहील अहमद, नेमिनाथ सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले.
प्रभाग क्र. 1 व 2 – अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी राखीव
प्रभाग क्र. 3, 5, 8, 9, 10, 13, 14 सर्वसाधारण (महिला) साठी राखीव
प्रभाग क्र. 4, 7, 11, 12, 15 – नागरी मागासवर्ग (महिला / सर्वसाधारण) साठी राखीव

प्रभाग क्र. 6 व 17 – सर्वसाधारण साठी राखीव
प्रभाग क्र. 16 – अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव
एकूण १७ प्रभागांपैकी महिलांसाठी ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच अनुसूचित जाती आणि नागरी मागासवर्गीयांना पुरेसे आणि न्याय्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.या आरक्षण जाहीरनाम्यामुळे नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून या निकालानंतर निवडणुकीसाठीची हालचाल सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.आरक्षण सोडत शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
