धमक्या देऊन सामान्य नागरिकाना त्रास!
नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरासह ग्रामीण भागात रोजच्या दैनंदिन रहदारीमध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून सामान्य नागरिकांना धमकी,धाक, व अवैध सक्तवसुलीच्या घटनांनी त्रास देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांचेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही,यामुळे नागरिकांमध्ये पोलिस विभागा विषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे
(फाईल फोटो )
प्राप्त माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आपल्या दैंनदिन कामाकरीता हजारो नागरिक हे तालुक्याच्या ठिकाणी येतात आपली कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून नागरिक हे आपल्या दुचाकी वाहनाने येऊन लवकरात लवकर घरी जाणेच पसद करतात अश्या वेळी मार्केट मधून काही साहित्य घेताना आपली वाहने दुकानासमोर उभी करून साहित्य विकत घेत असतानाच कीवा चहाच्या टपरीवर चहा पीत असताना नांदगाव खंडेश्वर परिसरात चारचाकी खाजगी वाहनाने प्रवास करत असतात.मात्र शहरी व ग्रामीण ट्रॅफिक पोलिस जबरदस्तीने त्या वाहनांना मोठ्या प्रमाणात चालान करीत असुंत्या चालान 500,1000,ते चक्क 3000 हजारा पर्यंत देत असल्याचा नागरिकांच्या तक्रारीं वरीष्ठ पोलिस अधिकारी यांचेकडे वाढल्या असून त्या कोणत्याही तक्रारीवर कार्यवाही होत असल्याने त्या त्रस्त नागरिकांनी पत्रकारांना फोन करून आपली कैफियत मांडली आहे.काही कारण नसताना कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली नांदगाव खंडेश्वर शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची अवैध मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे त्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे. पैशांची मागणी न मानल्यास त्या वाहन चालकांना पोलिसांकडून धमकी दिली जाते की,तुमच्यावर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल किंवा तुमची गाडी जप्त केली जाईल.ट्रॅफिक पोलिसांच्या या त्रासापायी नागरिकांनी नांदगाव शहरात येणे बंद केले असून पोलिसांच्या या दडगिरीमुळे छोट्या व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नागरिक नांदगाव शहरात आल्यावर चहा, नाष्टा करने टाळत असून यामुळे या व्यावसायिकावर उपासमारीची पाळी आली आहे. याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर ते अमरावती महामार्गावर सुद्धा ट्रॅफिक पोलिसांची अरेरावी ही मोठ्या प्रमाणात वाढली असून नांदगाव खंडेश्वर वरून अमरावती जाणाऱ्या सर्व वाहन चालकांना जबरदस्तीने अडऊन सर्व कागदपत्र असताना सुद्धा त्यांचेकडून धाक दाखवून पैसे उकडले जात असल्याच्या त्रस्त नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
(फाईल फोटो)
नांदगाव खंडेश्वर ग्रामीण विभागातील ट्रॅफिक पोलिस कर्मचारी आणि अमरावती शहरातील पोलीस यांच्यावर सुद्धा नागरिकांनी धाकधपटशाहीचे आरोप केले आहेत.याबाबत नागरिकांनी काही तक्रार केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. असे पोलिस नागरिकांना म्हणतात. आणि तुम्ही जर आमची तक्रार केलीत तर आम्ही तुम्हाला दंड ठोकू असा दम भरतात एवढ्यावरच हे थांबत नाहीत तर वसूल केलेल्या रकमेपैकी काही रक्कम स्वतःच्या खिशात ठेवली जात असल्याचे आरोपही नागरिकांनी केले आहेत.खेड्यापर्यंत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने अनेकांना खाजगी वाहने वापरणे अपरिहार्य ठरते परंतु त्यावरही असे ट्रॅफिक पोलिसांचे अवैध व्यवहार चालू असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तुटपुंज्या उत्पन्नात जीवन जगणाऱ्या नागरिकांना हा अन्याय सहन होत नाही आणि काही वेळा हताश होऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागते अशी भीती व्यक्त होत आहे.या प्रकारांमुळे पोलिस विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी या गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. तसेच राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे.
(फाईल फोटो)