नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
“श्री. शिवाजी शिक्षण संस्था”, अमरावती ,अंतर्गत “नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय” नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षक- पालक सभा संपन्न झाली. सर्वप्रथम, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. प्रदीपजी रा. ठाकरे , प्रमुख उपस्थिती उप- मुख्याध्यापक श्री. शशिकुमारजी देशमुख, पर्यवेक्षक श्री. राजेशजी देशमुख, पालक संघ सचिव, श्री.प्रमोदजी खेडेकर, पालक सदस्य सौ. शुभांगी डांगे तसेच असंख्य पालक वर्ग उपस्थित होते. सर्वप्रथम, मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या मानस करण्यात आला. माननीय मुख्याध्यापकांनी अध्यक्ष भाषणात “नॅशनल एज्युकेशन पॉलिसी” व भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या व शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केल्या जाईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नमिता कराळे व आभार श्री. जगदीश गोवर्धन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
