नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथे यावर्षी प्रथमच शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली लोकशाही मजबूत होण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजविणे भविष्याचा वेध घेऊन संविधानिक पद्धतीने ही निवडणूक माननीय मुख्याध्यापक श्री. प्रदीपजी रा. ठाकरे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.यावेळी एकूण ९७० विद्यार्थ्यांनी मतदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. वर्ग ५ ते १० मधून १७ विद्यार्थी निवडून आलेत. पहिल्यांदाच मतदान करताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नैतिक रवींद्र चौधरी, कु. माही सचिन काळे, स्वराज सुधीर सोळंके, कृष्णा गंगाधर खडसे, कु. कृतिका प्रवीण पकडे, कु. गुंजन राजुदास वैष्णव, हार्दिक राजेंद्र मरगडे, कु. परी आशिष कणसे, आरुष विनोद काळे, कृष्णा रवींद्र कडू, कु. श्रुतिका मारोतराव मुळे, कु. परी योगेश ढोरे, रक्षित विजय खोब्रागडे, कु. मोनिका अनिल मारोटकर, कु. अनुष्का अनंत आठवले, कु. मानसी संजय शेंद्रे, कु. जीविका सचिन बनसोड हे विद्यार्थी या मंत्रिमंडळामध्ये निवडून आले.ही निवडणूक यशस्वी करण्याकरिता श्री महेंद्र इंगोले, श्री एस. एस. काळे, श्री ए. एल. बीसेन, श्री आर. आर. वालसिंगे, श्री जगदीश गोवर्धन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी मुख्याध्यापक श्री.प्रदीपजी रा.ठाकरे, उप-मुख्याध्यापक श्री.शशिकुमारजी देशमुख, पर्यवेक्षक श्री. राजेशजी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
