
नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक योग दिन तसेच “एक पेड मा के नाम” अंतर्गत वृक्ष लागवड
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
“नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय” नांदगाव खंडेश्वर, येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांतर्फे सहज योगाचे सूक्ष्म तंत्रामध्ये ७ चक्राचा योगाभ्यास करण्यात आला. मा. मुख्याध्यापक श्री. प्रदीप रा. ठाकरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना व उपस्थितांना सहज योगाची आवश्यकता तसेच योगाभ्यासाने महत्त्व पटवून दिले. योगा करिता शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोबतच शाळेचे उप-मुख्यद्यापक श्री. शशीकुमारजी देशमुख, पर्यवेक्षक श्री. राजेशजी देशमुख उपस्थित होते. तसेच, “एक पेड मा के नाम” या केंद्राच्या धोरणानुसार शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्येकी एक वृक्ष लावावे याकरिता प्रेरित करण्यात आले.