आमदाराची बघ्याची भूमिका;कान भरणारा “तो” कार्यकर्ता कोण?
पत्रकारांमध्येही दुजाभाव
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरातील विविध विकासकामांचे नुकतेच नगर पंचायतीच्यावतीने भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन स्थानिक आमदारांच्या हस्ते करण्यात आले असले तरी या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लुडबुड करत ही कामे केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झाल्याचा खोटा देखावा उभा केला.प्रत्यक्षात ही सर्व कामे नगर पंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे आणि नियोजनाचे फलित होते हे मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले.
या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांनी काही निवडक पत्रकारांनाच आमंत्रित केले. विशेष म्हणजे हे पत्रकार कायम त्यांच्या पाठीमागे फिरत असलेले आणि अनुकूल वृत्तांकन करणारे आहेत. इतर स्थानिक पत्रकारांना या कार्यक्रमाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकारातून पक्षाच्या एका विशिष्ट गटाचे हितसंबंध जपले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.यामागे भाजपचाच एक कुटनितिक कार्यकर्ता असून तो आमदाराचे फक्त कान भरण्याचे काम करीत असल्याची चर्चा शहरात आहे.या साऱ्या प्रकाराबाबत आमदारांनी मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या अहंकारी भूमिकेवर त्यांनी मौन बाळगले असल्याचे दिसून येते. तसेही आमदार हे मौनीबाबा म्हणूनच संपूर्ण मतदार संघात परिचित आहेत.त्यामुळे राजकीय वर्तुळात आमदारांची भूमिका केवळ बघ्याची असल्याचे दिसून येते या कार्यक्रमात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना पण दूर ठेवण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. यामुळे पक्षातील गटबाजीला अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नांदगाव खंडेश्वर शहरात भाजपची स्थिती अशी झाली आहे की,
आमदारांपेक्षा पक्षाचे काही कार्यकर्तेच स्वतःला सर्वशक्तिमान समजून घेत आहेत. सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्या अपेक्षा,प्रश्न आणि सहभागाला दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना वाढीस लागली असल्याचे दिसून येते,आगामी काळात या रोषाचे पर्यवसन पक्षविरोधी वातावरणात होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.आगामी काही महिन्यात नगर पंचायतीच्या निवडणुका होणार असून यामध्ये काही असंतुष्ट कार्यकर्ते पक्ष्याला या काडीबाज कार्यकर्त्याच्या स्वभावामुळे इंगा दाखविणार असल्याचे बोलले जात आहे.नगर पंचायतीच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि सर्वसमावेशक सहभाग आवश्यक असताना सध्याची कार्यपद्धती ही पक्षाच्या संकुचित हितसंबंधांपुरती मर्यादित राहिली आहे,याची खंत जनतेतून व्यक्त केली जात असून आमदारांनी मात्र कान भरणाऱ्या कार्यकर्त्या पासून वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे अन्यथा पक्ष्याची वाट लागायला वेळ लागणार नाही हे मात्र तेवढेच खरे.!
एकच नंबर अचुक वृत्तांकन……..