
तहसीलदार सागर ढवळे यांना देण्यात आले निवेदन
मोर्शी / संजय गारपवार
समस्त मुस्लिम समाज व आंबेडकरी विचारक बांधव व शेतकरी ऑल इंडिया जमीअतुल कुरैश मोर्शी वरुड तालुका यांच्यावतीने मुस्लिम व्यापारी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व गोरक्षणची चौकशी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार सागर ढवळे यांना देण्यात आले होते.अमरावती, मोर्शी, वरूड येथे सुरू असलेल्या गोरक्षण संस्थांचे सर्व्हे करून सत्यता जाणून घेण्यात यावे.,जिल्हयात गोरक्षण संस्था कार्यरत आहेत.
आणि गोरक्षण संस्था हे जनावरांचे पालनपोषन, देखभाल व त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करते असे आमचे मत आहे. परंतु आम्ही केलेल्या निरीक्षणानूसार आमचे मत खोटे असल्याचे आम्हाला आढळते. वर नमुद विषयान्वये अमरावती, मोर्शी, वरूड तसेच संपूर्ण अमरावती तसेच विविध ठिकाणी असलेल्या गोरक्षण संस्थान हे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस स्टेशन मार्फत गुन्हयात जनावरे जप्त केल्या जातील व गोरक्षण संस्थांना पो.स्टे. मार्फत परस्पर जनावरे संरक्षण व संवर्धनासाठी हस्तांतरीत केल्या जातील तसेच न्यायालयातून सुध्दा गोरक्षण संस्थांना जनावरांचा तात्पुरता ताबा संरक्षण व संवर्धनासाठी गुन्ह्यामध्ये जप्त असलेल्या असलेल्या जनावरांचा दिला जातो. अनेक प्रकरणामध्ये आजपर्यंत जनावरे जप्त करण्यात आली व हजारोच्या संख्येने गोरक्षण संस्थांना संबंधित पोलीस स्टेशन मार्फत आणि न्यायालयामार्फत संरक्षण व संवर्धनाकरीता देण्यात आली. परंतु संबंधित गोरक्षण संस्था मध्ये जनावरे उपलब्ध नाहीत किंवा त्या जनावरांचे आजपर्यंत काय झाले, जिवंत आहेत की मृत्यू पावली किंवा परस्पर त्रयस्त इसमास विकुन टाकली याबाबत संबंधित गोरक्षण संस्थांनी आजपर्यंत न्यायालयात, संबंधित पोलीस स्टेशन ला किंवा जनावराच्या मालकांना माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून संपूर्ण जिल्हयात कार्यरत असलेल्या गोरक्षण संस्था हया संशयाच्या वर्तुळात आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्हयात गोरक्षण संस्थेचे सर्व्हे होणे व संपूर्ण अहवालाचा माहितीच्या आधिकारात आम्हाला सर्व्हे झाल्यानंतर माहिती होणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे म्हणून आमच्या सदर निवेदनाची त्वरीत हरकत घेवून गोरक्षण संस्थानचे संपूर्णपणे सर्व्हे व्हावे व आतापर्यंत त्यांनी न्यायालयातून, पोलीस स्टेशन मार्फत किती जनावरे प्राप्त केली व त्या जनावरांचे आजपर्यंत काय झाले याबाबत अहवालाचा खुलासा करावा आणि ज्या गोरक्षण संस्थांकडे माहिती उपलब्ध नाही आणि ज्या संस्थांनी घोळ केलेला आहे अशा संस्थांचे नोंदणी क्रमांक रद्द करण्यात यावे, गोरक्षण संस्थेच्या विश्वस्थांनी आजपर्यंत जनावरांची खानगी म्हणून जनावर मालकांकडून किती रक्कम प्राप्त केली आणि त्या रकमेचा अहवाल शासनाकडे सादर केला नाही तर त्या रकमेत काय घोळ करण्यात आला याबाबत चौकशी आणि संबंधित विश्वस्थावर त्यांनी घोळ केल्याबाबत त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.