
रात्रीच ट्रान्सफॉर्मर बदलून वीजपुरवठा सुरळीत
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती शहरामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले असून, 13 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.30 वाजता विद्याभारती कॉलेज कॅम्प परिसरातील 200 KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बिघाडला होता. यामुळे सुमारे 315 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.महावितरणच्या प्रकाशदूतांनी तातडीची दखल घेत तत्परता दाखवत नवा ट्रान्सफॉर्मर बसवला. परिणामी, रात्री 12.40 वाजता परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.या नैसर्गिक संकटाच्या काळात महावितरणकडून दाखवलेल्या तातडीच्या सेवेबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सहाय्यक अभियंता. विनायक वाढवे, प्रधान तंत्रज्ञ मोहम्मद नासिर, हरीश इंगोले, तसेच कॉन्ट्रॅक्टर लाखोडे व शेगोकार यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक करत नागरिकांनी आभार मानले.