
सर्वत्र होत आहे अभिनंदन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती येथे अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या श्रीमती माया केदार हयांची मूळ आस्थापना उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलडाणा ही जबाबदारी सांभाळत त्यांनी सक्षमपणे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळली व शासन आदेश दिनांक ११ जुलै २०२५ अन्वये त्यांची प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, अमरावती या पदावर विनंतीने बदली झाली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे समाज कल्याण विभाग अमरावती येथे प्रथम महिला प्रादेशिक उपायुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.