
अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
तिवसा /तालुका प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा,अमरावती ग्रामीण यांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला इतवारा परिसरातून अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेली सी.डी. डिलक्स मोटरसायकल हस्तगत केली आहे.
दिनांक ११ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन तिवसा येथे गजानन रघुनाथ देशकर (वय ४० वर्ष, रा. सातरगाव, ता. तिवसा) यांनी तक्रार दिली होती की, त्यांनी आपल्या शेतशिवारात (सातारगाव) दुपारी १ वाजता सी.डी. डिलक्स मोटरसायकल क्र. MH-27-AN-9144 उभी केली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेली. या तक्रारीवरून पो.स्टे. तिवसा येथे गुन्हा रजि. नं. ४३७/२५, भादंवि कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी अजय शालीकराम अडणे (वय ३५ वर्ष, रा. तेल्हारा, जि. अकोला) हा अमरावतीच्या इतवारा परिसरात चोरीस गेलेली मोटरसायकल विक्रीसाठी फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस इतवारा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यातील मोटरसायकल MH-27-AN-9144 किंमत सुमारे ₹१५,०००/- अशी मिळून आली.आरोपी अजय अडणे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सदर मोटरसायकल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन तिवसा येथे वर्ग केली आहे.ही यशस्वी कारवाई श्री. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक), श्री. पंकजकुमार कुमावत (अप. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पो.उप.निरिक्षक मुलचंद भांबुरकर, पो.हवालदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, पो.हवा. सागर धापड, पो.कॉ. विकास अंजीकर, पो.कॉ. शिवा शिरसाठ, पो.कॉ. रितेश गोस्वामी, चालक संजय प्रधान यांनी केली.पोलीसांच्या या वेळीवर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.