
वैदिक विज्ञान विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड
मोर्शी / संजय गारपावर
मोर्शी तालुक्यातील अंबाडा गावातील व्यावसायिक गजाननराव फुटाणे यांची कन्या सेजल हिला राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ गोवा येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल शहरात सर्वत्र तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. मोर्शी सारख्या तालुकास्तरीय गावांमध्ये आपले दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन गव्हर्नमेंट फ्लोरेंसिक सायन्स, औरंगाबाद येथे पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम (एम फॅट) या परीक्षेमध्ये कु सेजल हिने राष्ट्रीय स्तरावर २९ वी रँक प्राप्त करून संपूर्ण देशभरात असलेल्या १४ पदव्युत्तर कॉलेजेस पैकी गोवा येथील नॅशनल फ्लोरेन्सीक सायन्स युनिव्हर्सिटी येथे आपला प्रवेश निश्चित केला आहे. तू सोज्वल हिला गव्हर्मेंट फ्लोरन्सिक सायन्स औरंगाबाद येथे बीएससी फॉरेन्सिक मध्ये सुद्धा सत्तर पैकी ६९ गुण घेऊन तिने आपल्या विद्वत्तेचा परिचय दिला होता. सेजलचे वडील गजाननराव फुटाणे हे सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअर असून आपल्या या यशाचे श्रेय ती आपल्या आई वडील व परमेश्वराला देते. सेजल ने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल मोर्शी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दि २८ जुलै रोजी सेजलच्या घरी जाऊन कु.सेजलचे व तिच्या परिवाराच्या अभिनंदन केले असून कु. सेजल वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.