
मोर्शी/ संजय गारपवार
अवयव दानाचे प्रमाण वाढावे व अवयव दानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे तसेच समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली.ही मोहीम उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार सर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 3 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अवयव दान पंधरवाडा ही एक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजाला सोबत घेऊन उपक्रम राबविले जात आहेत या मोहिमेमध्ये मोर्शी शहरांमधील श्रीराम नर्सिंग कॉलेज ,स्वर्गवासी अण्णासाहेब कानफाळे स्मृती विद्यालय येथे अवयव दाना बद्दल शपथ घेण्यात येऊन जनजागृती करण्यात आली तसेच भिंती पत्रक लावण्यात आले अवयव दान पंधरवड्यामध्ये सोशल मीडिया जनजागृती मोहीम अवयव दानावर ऑनलाईन व्याख्यान रुग्णालय क्लिनिकमध्ये क्यूआर कोड पोस्टर प्रदर्शन बाह्य रुग्ण प्रतीक्षालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन बाजारपेठेमध्ये माहितीपत्रके वाटप शाळा रुग्णालयामध्ये संकल्प भिंत वृक्षारोपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता सत्र रांगोळी स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिसेविका वर्षा दारोकर, मीनाक्षी वगारे, सुमन जावरकर ,प्रतीक्षा पांचाळे, आरोग्य कर्मचारी विनय शेलूरे,प्रकाश मंगळे ,प्रशांत बेहरे ,नंदू थोरात तसेच नर्सिंग कॉलेजचे मुख्याध्यापक राहुल धवळ कॉलेजच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये सहभाग घेतला होता.