
परतवाडा पोलीसांची प्रभावी कामगिरी ८ मोबाईलसह आरोपी अटकेत
परतवाडा / प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार चोरी,घरफोडी,मालमत्तेवरील गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता अमलात आणण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत परतवाडा पोलीस स्टेशनच्या डि बी पथकाने एक महत्त्वाची कारवाई करत मोबाईल दुकान फोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यामध्ये ८ अँड्रॉईड मोबाईल जप्त करण्यात आले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.फिर्यादी हेमराज जयरामदास दौलतानी (वय ३९, रा. गुरुनानक नगर, परतवाडा) यांनी दिनांक १३ जुलै २०२५ रोजी परतवाडा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांच्या ‘ओमसाई मोबाईल शॉपी’ या दुकानाचे कुलूप तोडून आणि शटर वाकवून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून ८ अँड्रॉईड मोबाईल (किंमत अंदाजे ₹६८,०००/-) चोरी केले होते. यावरून परतवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ४८७/२०२५, भा.दं.वि.कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.डि बी पथकाने तपासाची चक्रे फिरवित असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,मयुर नारायण सोंदिया (वय २१, रा. कैकाडीपुरा,परतवाडा) हा जयस्तंभ चौक परिसरात एक ओपो कंपनीचा मोबाईल विक्रीच्या प्रयत्नात आहे.त्यावरून पोलीसांनी त्वरित कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले.आणि आरोपीस विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरी केलेले खालील मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिले.
1. Realme 6 – ₹10,000
2. Redmi Note 11 – ₹10,000
3. OnePlus Nord C2 – ₹12,000
4. Xiaomi 11i – ₹11,000
5. Realme Narzo N55 – ₹6,000
6. Oppo A3X – ₹8,000
7. Vivo Y19 – ₹7,000
8. Oppo F15 – ₹5,000
या सर्व मोबाईलची एकूण किंमत ₹६८,०००/- रुपये असून ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के,स.पो.निरीक्षक.संजय अत्राम यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ.सचिन होले,सुधीर राऊत,पो.कॉ.विवेक ठाकरे,घनश्याम किरोले, शुभम शर्मा,जितेश बाबील,योगेश बोदुले,सचिन कोकणे यांनी केली.परतवाडा पोलीसांची ही कामगिरी नागरिकांत पोलीस दलाबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे.