अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
सातत्याने नियमित जनसंपर्क आणी जनतेच्या कामासाठी सैदव तत्पर राहणारे लोकप्रिय नेतृत्व मिलिंद बांबल हे आपल्या मनमिळाऊ स्वभाव सोबतच अभ्यासू आणी कर्तव्यदक्ष कार्यशैली मुळे जनतेमध्ये विशेष लोकप्रिय आहे. प्रभागातील नव्हे तर शहरातील कोणाच्याही कामाला तात्काळ धाऊन जाणारे मिलिंद बांबल यांनी नगरसेवक असतांना नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले हिंदू स्मशानभूमी परिसरासह संपूर्ण प्रभागात प्रचंड विकास काम केले सुमारे 53 रस्ते कॉंक्रिटिकरण केले होते प्रभागाच्या विकासासाठी मनपाच्या विविध हेडमधून मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आनला होता . सिव्हिल इंजिनियर असलेले उच्चशिक्षित मिलिंद बांबल यांची जनतेचे काम करण्याची उत्कृष्ट पध्दती मुळेच ते शहरात प्रसिद्ध आहेत जनतेचे काम झालेच पाहिजे हे त्यांचे ध्येय असते त्यासाठी वेळ पडल्यास निवेदन , आक्रमक आंदोलन सुद्धा करतात जनतेसाठी केलेल्या आक्रमक आंदोलनमुळे त्यांच्यावर शेकडो केसेस त्यांच्यावर दाखल आहेत स्वतःचा प्रभाग नसतानासुद्धा अंबा नाल्यावरच्या चुकीच्या बांधकामाला त्यांनी केलेला मनपा आमसभा असो किंवा रस्तावरचा आक्रमक विरोध सर्वांना माहित आहे.

त्यांच्या आक्रमक विरोधा मुळेच मनपाने चुकीचे बांधकाम बंद केले पन्नालालनगर नाल्याच्या सुरक्षा भिंतीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन करणारे ते एकमेव माजी नगरसेवक आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल घेवून मनपाने पहिल्यांदा ग्याँबियान पध्दतीने बांधकाम करून सुरक्षा भिंतीचे काम केले , विशेष मनजे करोडो रुपयाचे पन्नालालनगर मैदान जनतेसाठी सार्वजनिक मनुनच राहावे यासाठी कोणाच्याही दबावात न येता अमरावती ते मुंबई मंत्रालय ते न्यायालय पर्यंत मागील 27 वर्षापासून स्वतःजवळचे पैसे खर्च करून लढणारे व मैदान वाचवणारे ते एकमेव माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता आहेत सोबतच भुतेश्वर चौकातील मनपाला सुद्धा माहित नसलेल्या दोन खोल्यांमध्ये आक्रमक भूमिका घेऊन मनपाचा सार्वजनिक दवाखाना सुरू केला परिसरातील नागरिकांना येथे सकाळ , संध्याकाळ निशुल्क औषधउपचार मिळते सोबतच मनपा शिक्षण सभापती असतांना त्यांचा कार्यकाळ विशेष गाजला स्वतः रोज सकाळी मनपाच्या शाळेत भेटी देवून तेथील व्यवस्था पाहणारे आणी विध्यार्थीन्ना उच्चदर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले मनपाच्या विध्यार्थीन्ना खाजगी शाळेसारखेच आकर्षक गणवेश त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाला मनपाच्या सर्व विध्यार्थीन्ना , तसेच शहरातील अंध विध्यार्थी , अंध शिक्षक , अंध व्यवसायिक यांना मनपाच्या सिटी बस मध्ये त्यांनी वर्षभर मोफत प्रवासाची व्यवस्था करून दिली होती उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले मिलिंद बांबल यांनी अमरावती शहरासोबतच ग्रामीण भागात सुध्दा मोठ्या प्रमाणात कार्यकर्तान्चे सक्रिय संघटन तयार केले जिवानाचे 35 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टी साठी काम केले वयाच्या 17 वर्षापासून शारदानगर वार्ड उपाध्यक्ष , अध्यक्ष , भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस , युवा मोर्चा अध्यक्ष , बडनेरा विधानसभा प्रमुख , तीन वेळा किसान मोर्चा शहरजिल्हा अध्यक्ष आदी पदे सुद्धा त्यांनी यशस्वी रित्या सांभाळली शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळावा मनुन दिनांक -: 15/5/2001 ला अमरावती दौऱ्यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गाडीसमोर एकटाच आडवा जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती त्यांच्या पत्नी सौ.विजया बांबल यांनी सुध्दा नगरसेविका असतांना आपल्या कार्यकाळात चांगले कार्य केले होते मिलिंद बांबल हे मागील 30 वर्षापासून कधीही न थांबता सातत्याने रोज सकाळी प्रभागात फिरून जनतेच्या समस्या सोडवितात फक्त प्रभागात नाही तर शहरातील कोणाच्याही समस्या सोडवण्यासाठी तात्काळ धावून जातात आता लवकरच महानगरपालिका निवडणूक होत आहे अनेक जन निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहे पन जनतेच्या कामासाठी पूर्ण वेळ देणारे स्वच्छ प्रतिमेचे उच्च शिक्षित एका फोनवर समस्या सोडविण्यासाठी कुठेहि धाऊन जाणारे मिलिंद बांबल यांनी आपल्या प्रभागातून निवडणूक लढवावी यासाठी नागरिक आग्रह करीत आहे जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे विकासात्मक कामे झालीच पाहिजे यासाठी जनतेच्या मागणीनुसार मिलिंद बांबल व त्यांच्या पत्नी सौ. विजया बांबल हे दोघेही महानगरपालिका निवडणूक लढणार आहेत.
