
प्रमुख पाहुणे हस्ते वृक्षारोपण व १००० रोपट्याचे वाटप
चांदूररेल्वे /तालुका प्रतिनिधी
चांदूररेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद (मा. शा.) शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ७ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेच्यात प्रमुख पाहुणे यांनी हरितक्रांती जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या फोटोचे पूजन करत दिप प्रज्वलीत करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच वृक्ष वाटप कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांचे मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण शर्मा व जिप शाळेतील मुख्याध्यापक डॉ श्रीकांत देशमुख व पत्रकार संघाच्या सदस्यांनी इतर वृक्ष भेट देऊन स्वागत केले.देवराई फाउंडेशन पुणे व्दार संचालित अमरावती जिल्हा शाखेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष वाटप करून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून चांदूररेल्वे मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद (मा. शा.) शाळा व कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने जिल्हा परिषद वतीने शाळेच्या मैदानात आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे,डॉ राजेश शेरेकर,तहसीलदार पुजा माटोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल घुटे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके,दिपिका वाजपेयी यांनी वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन होत नसल्याने सृष्टीवरील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकांनी वृक्षारोपण वृक्षसंवर्धन करावे असा संदेश दिला देवराई फाउंडेशन चे जिल्हा प्रभारी डॉ राजेश शेरेकर यांनी सांगितले की जिवंत असे पर्यंत भूतलावर १लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला यावेळी उपअभियंता मनिषा खरय्या,पोलीस अधीक्षक अजय आकरे,वैद्यकीय अधीक्षक आतिश पवार,गट शिक्षणाधिकारी संदीप बोडके ,पंचायत समिती सुशिल यादव,रविंद्र दिवान हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण शर्मा,सचिव बंडू आठवले राजेश सराफी,अभिजित तिवारी,प्रा सुधिर तायडे, प्रा प्रमोद इंगळे,अतुल उज्जैनकर,मंगेश बोबडे,मनोज गवई,अमोल ठाकरे,हरीश ढोबळे,सुभाष कोटेजा,दिनेश जगताप तर जिप शाळेतील मुख्याध्यापक डॉ श्रीकांत देशमुख,अतुल शिरभाते,मनिषा देशमुख,साधना देशमुख,मनिषा यावले,विजया राऊत,नितिन येवतकर, मनोहर गभते,प्रियंका येवतकर,प्रकाश ठाकरे,सविता मळसणे,रूपाली सपाटे, सय्यद उमेर अहमद यांनी अर्थक परीश्रम घेतले.या वृक्षारोपण कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरीक बच्चू वानरे, प्रविण्य देशमुख,डॉ वसंत खांडार,अँड राजेश अंबापुरे,अमोल देशमुख,डॉ सुषमा खंडार, सतिश देशमुख बचपन इंटरनेशनल स्कूल फाउंडर मिनाक्षी राॅय,APIनंदलाल लिंगोट,शिवाजी घुगे,API शरद अहीरे,PSI नितेश आंदळे, PSI पंडे मॅडम, प्रविण मेश्राम पोलिस कर्मचारी, नगरपालिका कार्यालय अधीक्षक योगेन वासनिक,आशिष कुराडे,पल्लवी जांमोदकर,शारदा कावळे,मनिष कनोजे,बबलू इमले,देवराई समन्वयक बिपिन देशमुख,बाधकाम विभाग मंजूषा येवले,सुरभी सोनटके,गटसमन्वयक मंगेश उल्हे, विषयतज्ज्ञ श्रीनाथ वानखडे,केंद्रप्रमुख किरण पाटील, सुभाष सहारे आदी लोकं कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर तायडे प्रास्ताविक बंडू आठवले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डॉ श्रीकांत देशमुख यांनी केले.
तालुका मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद शाळा तसेच गट संसाधन केंद्राच्या वतीने १००० रोपट्याचे वाटप
आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व बचपन इंटरनॅशनल स्कूल ५० रोपटे, समाजसेवक प्राविण्य देशमुख २० रोपटे तर चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगावं केंद्रातील 14 शाळांना रोपटे भेट देण्यात देण्यात आली. केंद्रप्रमुख किरण पाटील व विषयतज्ज्ञ श्रीनाथ वानखडे यांचे हस्ते हे रोपटे शाळांना हस्तांतरित करण्यात आले. जि.प. शाळा मांडवा, जि.प. शाळा टेंभुर्णी, जि.प. शाळा दिलावरपूर, जि.प. शाळा तुळजापूर, जि.प. शाळा पाथरगावं, जि.प. शाळा सालोरा, जि.प. शाळा उमरपूर, जि.प. शाळा अमदोरी, जि.प. शाळा आमला, जि.प. शाळा शिरजगाव, जि.प. शाळा जळका, समता विद्यालय जळका, श्रीकृष्ण विद्यालय आमला, इंदिरा कन्या विद्यालय आदी शाळांना रोपटे वाटप करण्यात आले असून सर्वांनी आपल्या स्तरांवर वृक्षारोपण केले.