
व्यवसायिकांना बेरोजगार बनविण्याचा प्रयत्न करू नये.
व्यावसायिकांची पर्यायी जागेची व्यवस्था करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी अतिक्रम आडविण्याच्या नावाखाली अनेक व्यवसायिकांना बेरोजगार बनविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करण्यासाठी मटन चिकन चे दुकान, भाजीपाल्याचे दुकान, टू व्हीलर दुरुस्ती चे दुकान, रेडिमेट कपड्याचे दुकान, पान ठेले, सलून चे दुकान, मोटर गॅरेज इत्यादी व्यवसायाच्या माध्यमातून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह सुशिक्षित बेरोजगार करीत आहेत परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची स्थानिक नागरिकांचे अडचण नसताना तसेच स्थानिक नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार केली नसताना अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे व्यवसायासाठी थाटलेले दुकान अतिक्रमांच्या नावाखाली जमीन दोस्त करण्यात आलेले आहे. अनेक कुटुंबांना बेरोजगार केले आहे. चांगला रोजगार सुरू असताना व्यावसायिकांना बेरोजगार करणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केलेला आहे असा आरोप संजय आठवले यांनी केला आहे. हा अतिरेक मनपा आयुक्त यांनी त्वरित थांबवावा असे आव्हान भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना केले आहे. अनेक व्यावसायिक हे 10 ते 15 वर्षापासून एकाच ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत असे असताना सुद्धा त्यांचे सुद्धा दुकान अतिक्रमण च्या नावाखाली काढून टाकण्यात आले हा खूप मोठा अतिरेक मनपा आयुक्त यांनी अमरावती शहरांमध्ये चालविलेला आहे. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसाय निमित्त कर्ज काढले काहींनी व्याजाने कर्ज काढून आपले दुकान मांडले अशा वेळी व्यावसायिकांना बेरोजगार करणे हे योग्य वाटत नाही. सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिकांचे अगोदर पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी आणि नंतर त्यांचे अतिक्रमण पाडण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा चे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी केली आहे.पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण पाडणे योग्य वाटत नाही मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची ही कार्यवाही निषेधार्य आहे आणि अतिक्रमण पाडण्याच्या च्या नावाखाली सुरू असलेला अतिरेक मनपा आयुक्तांनी त्वरित थांबावा अन्यथा मनाबा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांच्यासह नईम अली नियाज अली,राजेंद्र वानखडे, अब्दुल रहीम ठेकेदार, इब्राहिम मामू, महेश तायडे, मनोज थोरात, प्रवीण सरोदे,सागर वानखडे,दिलीप लव्हाळे दिवाकर मेश्राम, सतीश पाटील, संतोष हरणे, पवन माहोरे, सुरज कराळे, कमलेश सोनवणे, पवन हरणे, चैतन्य बिजवे, प्रमोद नेहर,संजय सदाफळे, शरद मोहोळ दादाराव खडसे, शेख अनवर, रोशन जंगम,यांच्यासह शेकडो नागरिकांनी दिला आहे.