नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागामध्ये संतविचार पोहचवून सर्वात प्रभावी व जुने प्रबोधनाचे माध्यम म्हणून काम करणारे भजनी मंडळे असतात. त्यापैकीच श्रीराम महिला भजन मंडळ मंगरूळ चवाळा हे भजन मंडळ प्रबोधनाचे काम करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखोबा, संत जनाबाई, संत बहिणाबाई या अशा असंख्य संतांनी समाजोन्नती साठी रचलेले अभंग, भजन भजनी मंडळच्या माध्यमातून तेवत ठेऊन प्रबोधन करण्याचे काम श्रीराम महिला भजन मंडळ मधील महिला करत असतात. गावातील व इतर गावातील भजन दिंडीमध्ये सहभागी होणे, मंदिर व तसेच घरगुती भजन करून संतविचार व त्यातील अर्थपूर्ण मर्म लोकांपर्यंत पोहोचवून हा वारसा जपण्याचे काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे भजन मंडळ प्रबोधनाच्या कार्यात कार्यरत असून अनेक ठिकाणी पुरस्कार सुद्धा मिळविले आहे. ज्यामध्ये स्थानिक काही संस्था, गणेश व दुर्गा मंडळ, आमदार अशा आयोजकांनी भजन मंडळाचा कार्यक्रम व स्पर्धा ठेऊन पुरस्कृत केले आहे. श्रीराम महिला भजन मंडळामध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त महिला असून गेल्या 25 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांपासून कार्यरत आहेत. भजनांच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या अशा महिला पुरूषांना सरकारतर्फे पेन्शन सुरू व्हावे व याव्यतिरिक्त अनेक साऱ्या योजना यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे व ग्रामीण भागातील भजन मंडळाजवळ भजनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची सुद्धा कमतरता असते त्यामुळे हे प्रबोधनाचे काम असेच सुरू राहण्यासाठी काही गोष्टींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. श्रीराम महिला भजन मंडळामध्ये गुंफा प्रल्हादराव गावनेर, मंगलाताई इंझळकर, सुलोचना गावनेर, सुरेखा पिंपळकर, तारा सोनोने, प्रभा मुल्हार, प्रमिला शिंदे, मिरा साबळे, रूख्मा टांगले, संगिता टेवरे, अनुसया गावनेर, रिना अवझाडे, पद्मा गावनेर, द्वारकाबाई जगनाळे, शशिकला टांगले, चंद्रकला वारकर, सुमित्रा राऊत, सविता भवरे, लिला गुल्हाने, चंद्रकला पिंपळकर, सुगंधाबाई मुंजेवार, शांताबाई ढेंगे, मंजू काटकर, सरस्वती रावेकर, शशीकला चवाळे, निर्मला गुल्हाने, कमला गाढवे, मयुरी गावनेर, कुसुम पिंपळकर, वेणु कारेकर, कमला गावनेर इ. महिला भजन मंडळातून प्रबोधन करतात.
