
खा. बळवंत वानखडे यांच्या रेल्वे प्रशासनाला इशारा अन्यथा १३ जुलै पासून ग्रामस्थासहीत रेल्वे लाईनवर बसून आंदाेलन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
मालखेड परिसरातील नवीन रेल्वे अंडरब्रिज सतत पावसामुळे पाण्याने तुडुंब भरला .परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत असून, रुग्ण, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरीकांच्या सुविधेकडे रेल्वे प्रशासानचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत असल्याने संतत्प नागरीकांनी खा. बळवंत वानखडे यांचेकडे धाव घेत रेल्वे अंडरब्रिज समस्यांची माहिती घेतली. या अंडर ब्रिज बांधकामा करिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी घेण्यात आलेले नाही, जे अंडर ब्रिज ची स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे आणि बांधकाम सुरू आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. खा. बळवंत वानखडे यांनी १३ जुलै राेजी तिव्र आंदाेलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.या संदर्भात खा. बळवंत वानखडे यांनी रेल्वे अधिकारी सोबत दूरध्वनी द्वारे संपर्क साधला आहे तात्काळ मार्ग संदर्भात आदेश देण्यात आले.
या संदर्भात रेल्वे प्रशासना सोबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे असून या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला विचारणा केली. यावेळी खासदार वानखडे यांनी नागरीकांच्या सुविधेकरीता काही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. ज्यामध्ये अंडरब्रिजची तातडीने दुरुस्ती व नीचाराची व्यवस्था करावी. दुरुस्ती हाेत नाही ताेपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था उभी करावी, सदर कार्यवाही दि.१२ जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश खा. वानखडे यांनी दिले.या मुदतीपर्यंत याेग्य ती कार्यवाही झाली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या वतीने दि.१३ जुलै २०२५ पासून मालखेड रेल्वे ट्रॅकवर तीव्र आंदाेलन करण्यात येईल. सदर आंदाेलन शांततेच्या मार्गाने हाेईल, परंतु त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील असा इशाराही खा. बळवंत वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. या पाहणी दरम्यान प्रा. शैलेश गवई , गिरीश चौधरी आणि समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते.