
रक्तदान ,वृक्षारोपण आणि रुग्णांना फळ व बिस्किटांचे केले वितरण..
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
विदर्भ की बुलंद आवाज’ म्हणून समग्र महाराष्ट्रात सुपरिचित असलेले माजी आमदार तसेच वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसड यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांदूर रेल्वे शहरात अनेक लोकाभिमुख कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून अरुणभाऊ अडसड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील कुऱ्हा रोड वर स्थित असलेल्या सिंधी धर्मशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये तब्बल 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथील चमू डॉ. गौरी जगताप, रक्त संक्रमण अधिकारी , मिलिंद तायडे, जनसंपर्क अधिकारी ,रश्मी मुळे, परिचारिका , मंगेश उमप ,प्रमोद ठाकरे या सर्व वैद्यकीय चमुने सेवा दिली.समतोल निसर्गाचं महत्व आणि वृक्ष संवर्धनाच्या जाणीवेतून मोकळ्या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष लावून वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. समाजिकतेचे भान ठेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करून अरुण भाऊ अडसड यांचा वाढदिवस अशा प्रकारचे अभिनव उपक्रम आयोजित मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.या सर्व कार्यक्रमाला भा.ज.प.शहर अध्यक्ष नंदा वादवानी,समाजिक कार्यकर्ते पप्पू भालेराव, बंडू भुते,माजी नगर सेवक अजय हजारे, बच्चू वानरे, सचिन जैस्वाल, अमोल वानखडे, उत्तमराव ठाकरे, बबनराव गावंडे रोशन खेरडे गजानन ठाकरे, बाबा चव्हाण,अंकित कदम, विजय मिसाळ, प्रतीक सवाने,प्रमोद नागमोते, बळवंत नागणे, अनिल मोटवानी, विवेक चौधरी, प्रशांत देशमुख, प्रशांत मेंढे, सुरज चौधरी, विवेक चौधरी, जहीर भाई, वसंत खंडार, विकी मानकानी ,धीरज चव्हाण,कैलाश मेश्राम, अपर्णा जगताप, सविता ठाकरे,सुषमा खंडार, सुषमा पातुर्डे,लता बागडे, वंदना हजारे,संगीता बाबर यांचेसह भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.