
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
स्थानिक माहुली चोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका येथे झाडाला राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याची माहिती रोपवाटिका अधिकाऱ्यांनी दिली.
कार्यक्रमाला रोपवाटिका अधिकारी कोकाटे साहेब तसेच चौधरी साहेब, खडसे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी शोभाताई कोकाटे यांच्याकडून रोपवाटिकेतील मजुरांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सनकोट चे वाटप करण्यात आले.यावेळी गावातील मजूर राजेशभाऊ मेश्राम, ग्राम रोजगार सेवक गजानन गाडेकर, तुकारामजी गायकवाड, राजेंद्र गव्हाणे, सचिन राऊत, मंदाबाई खंडारे, मीनाबाई चोखट, ललिताबाई लांजेवार, उषाबाई भोसले, मीनाबाई खंडारे, राजकन्याबाई फाटे, वंदनाबाई खांडेकर, रंजनाबाई गावंडे यांच्यासह स्थानिक मजुर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.