
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव अभियान अंतर्गत झाला कार्यक्रम
तिवसा/तालुका प्रतिनिधी
उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोंणती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती कार्यालय, तिवसा व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा- तिवसा यांच्या संयुक्त विध्यमाने नुकत्याच पार पडलेल्या बँक कर्ज मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील १४ महिला स्वयं सहायता समूहांना एकून ६४ लक्ष रुपयांचे बँक अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात एकूण १४ महिला स्वयं सहायता समूहांना कमी व्याजदराने स्वावलंबनासाठी कर्ज वितरण करण्यात आले. या कर्जाच्या सहाय्याने महिलांनी छोट्या व्यवसायांचा प्रारंभ, हस्तकला, शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय, लोणचं निर्मिती, शिवणकाम, किराणा दुकान अशा विविध उद्योगांसाठी कर्ज मंजूर करण्यात आले.
आदी क्षेत्रांमध्ये काम सुरू केले आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी श्री. अभिषेक कासोदे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा प्रबंधक श्री. मंगेश रामटेके, उमेद कक्ष येथील तालुका अभियान व्यवस्थापक श्री. हरिष फरकाडे, श्री. अजय कुलथे (ता.व्य), श्री. स्वप्नील रोहनकर (ता.व्य), सौ. श्रुती वानखडे (ता.व्य), प्रभाग समन्वयक श्री. श्रीकृष्ण काळे, श्री.सुमित वासुकर सौ. रूपाली मेहकरे, बँक सखी नमिता तिखे, श्री. परिक्षीत भडके (सं.परिचालक) व कक्षातील इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बँक मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भरतेकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अधिक संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अनेक महिलांनी या कार्यक्रमाचा सकारात्मक लाभ घेतल्याचे समाधान व्यक्त केले.