अधिक्षक अभियंता ते जनमित्र सर्वांना थकीत बिल वसूलीचे उध्दिष्ठ
वीज ग्राहकांच्या बिल न भरण्याच्या उदासिनतेवर वीज पुरवठा खंडित करण्याचा पर्याय
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महावितरण अमरावती परिमंडळात वीज बिलाची थकबाकी कमी न होता दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. मार्च २०२५ मध्ये असलेली ७५ कोटीची थकबाकीत वाढ होवून जुलै २०२५ मध्ये १५६ कोटी झाली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या वसुलीसाठी अधीक्षक अभियंता ते जनमित्र सर्वांना ग्राहकनिहाय थकीत वीजबिल वसूलीचे उध्दीष्ठ देण्यात आले असल्याची माहिती मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांनी दिली आहे.

महावितरणचे अस्तित्व हे वीजबिलांच्या महसूलावरच अवलंबून आहे. परंतू मार्च २०२५ नंतर प्रत्येक महिन्यात अपेक्षीत महसूलाच्या उद्दिष्टाप्रमाणे बिलांची वसूली झालेली नाही,त्यामुळे थकबाकी कमी न होता त्यात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे थकबाकी आणि चालू वीजबिलाच्या वसुलीवर परिणाम होत असेल तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.परिमंडळात विविध वर्गवारीतीस ३ लाख ८१ हजार ४०६ ग्राहककांकडे असेलल्या १५६ कोटी रूपयाच्या थकीत रकमेत अमरावती जिल्ह्यातील १ लाख ९०९३६ ग्राहकाचा समावेश असून त्यांच्याकडे ६७ कोटी ३९ लाख रूपयाचे आणि यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ९०४७० ग्राहकांकडे ८८ कोटी ८१ लाख रूपयाची वीज देयके थकली आहे.तसेच परिमंडळात १ लाख रूपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकाची संख्या ११५७ असून त्यांच्याकडे ३२ कोटी ६७ लाख रूपये थकीत आहे.यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४७२ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ६५५ ग्राहकाचा समावेश असून त्यांच्याकडे अनुक्रमे १४.१७ कोटी आणि १८.५५ कोटी थकीत आहे.त्यामुळे अधीक्षक अभियंता ते जनमित्र यांना वसूलीचे उध्दिष्ठ देण्यात आले असून १ लाख रूपयापेक्षा जास्त थकबाकी असणारे ग्राहकाची तपासणी अधीक्षक अभियंता,५० हजार ते १ लाख रूपयापर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकाची वसूलीचे उध्दिष्ट कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असून २५ ते ५० हजार रूपयाची थकबाकी असणारे ग्राहक उपकार्यकारी अभियंता,५ हजार ते २५ हजार थकबाकीवाले ग्राहक शाखा अभियंता आणि ५ हजारापरर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या थकबाकीची वसूलीचे उध्दिष्ट जनमित्रांना देण्यात आले आहे.ग्राहकांची वीजबिल भरण्याची उदासिनता बघता महावितरणकडून नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सक्रीय करण्यात आली आहे.थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर उतरले आहे.तसेच आगामी दिवसं हे सणासुदीचे असल्याने महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी आणि वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
